आम्हाला सावरकरांबद्दल प्रेम कायम; कुणीही शिकविण्याची गरज नाही. : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
स्थानिक बातम्या

आम्हाला सावरकरांबद्दल प्रेम कायम; कुणीही शिकविण्याची गरज नाही. : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Gokul Pawar

Gokul Pawar

नागपूर : सोमवारी सभागृहात जो प्रकार पाहिला आहे. त्यातून आम्हाला काही शिकविण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला सावरकरांबद्दल प्रेम आहे आणि ते कायम राहणार आहे. आम्हाला शिकविण्याची गरज नाही. अर्धवट सावरकर घेऊ नका, पूर्णपणे घ्या असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना प्रत्युतर दिले, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक झाली.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांवरून केलेल्या टिकेचाही समाचार घेतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते.

यावेळी बोलताना शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत आहे, अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती. फडणवीस यांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा आणि शिवसेना एकत्र लढले. पण आमच्यात काही ठरले होते. त्याचे पुढे काही झाले नाही. तसेच फोडाफोडीच राजकारण करण्याचे काम मागील पाच वर्षात काही राज्यात त्यांनी केले आहे.

त्यामुळे त्यांनी आम्हाला राजकारणाबद्दल शिकवू नये. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना. आपण सरकार स्थापन केले आणि जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबाबतचा प्रत्यय अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आपण जनतेचा भ्रमनिरास होणार नाही याची काळजी घेऊ काम करा,” असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केलं आहे.

Deshdoot
www.deshdoot.com