Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : जि. प. सदस्या नूतन आहेर यांच्याकडून ‘देशदूत’च्या आरोग्य अभियानाचे कौतुक

Video : जि. प. सदस्या नूतन आहेर यांच्याकडून ‘देशदूत’च्या आरोग्य अभियानाचे कौतुक

नाशिक | प्रतिनिधी

सुवर्ण महोत्सवानिमित्त दैनिक देशदूतकडून जिल्हाभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. नुकतेच देवळा येथे आयोजित आरोग्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या जि. प. सदस्या नूतन आहेर यांनी नामको हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ रोहन देव यांच्या कौशल्याची अनुभूती घेतली. ‘देशदूत’च्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

- Advertisement -

देवळा येथे सोमवारी झालेल्या ‘देशदूत’च्या आरोग्य महोत्सवाला हजेरी लावली होती. मणक्यांच्या त्रासामुळे त्या गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त होत्या.

यावेळी सौ. आहेर यांनी डॉ. देव यांच्याकडून तपासणी करून घेतली. यावेळी डॉ. देव यांनी दिलेल्या योग्य सल्ल्यानुसार आणि काही मणक्याला आराम मिळावा यासाठी दिलेल्या हलक्या व्यायामाने. त्यांना काही मिनिटातच त्रास बरा झालेला वाटला.

त्यानंतर सौ. आहेर यांनी आज नाशिक येथील नामको हॉस्पिटल गाठत डॉ रोहन देव यांचे आभार मानले. देवळा येथे सर्वांसाठी फिजिओथेरपी उपचार उपलब्ध करून देण्याचे सौ. आहेर यांनी डॉ. देव यांना साकडे घातले. शिवाय डॉ. देव यांना देवळ्यात आठवड्यातून एक दिवस ओपीडीसाठी जी काही मदत लागेल तीदेखील आपण उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या