Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिकरोड : अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने रिकामे करण्याची मोहिम सुरू

नाशिकरोड : अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने रिकामे करण्याची मोहिम सुरू

नाशिक : सेवानिवृत्त होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून शासकीय निवासस्थाने बेकायदेशीररित्या बळकावून बसलेल्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने रिकामे करण्याची मोहिम जोरात सुरू असून नाशिक रोड येथील अनेक सरकारी निवासस्थाने खाली करण्याची कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे

नाशिक रोड येथील शासकीय निवासस्थानाची जागा शासनाने नाशिकच्या विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी साठी मंजूर केली असून या जागेत अनेक सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांनी बेकायदेशीररित्या ताबा ठेवला आहे. कुठल्याही सरकारी कार्यालयाचा अधिकारी किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याला सरकारी निवासस्थान लगेच रिकामे करणे आवश्यक असते. परंतु येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीररित्या बळजबरीने स्वतःच्या ताब्यात ठेवली आहेत, रिकामी करणे आवश्यक असल्याने हि मोहीम सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिक विभागीय प्रशिक्षण प्रबोधिनी साठीच्या नियोजित सरकारी जागेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करून सदर निवासस्थाने रिकामे करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.या कारवाईत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कठोर कारवाई केली जाईल.

-अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी तथा निबंधक, विभागीय प्राशासकीय प्रशिक्षण संस्था,नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या