गुजरात सीमेवर लाकडाची तस्करी; वन विभागाच्या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक बातम्या

गुजरात सीमेवर लाकडाची तस्करी; वन विभागाच्या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पेठ / नाशिक | प्रतिनिधी 

शेकडो घनमीटर लाकडाचा साठा हरसूल वनक्षेत्रात वनविभागाने छापा टाकून जप्त केला आहे. सदर साठा गुजरात कडे वाहून नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने छापा टाकत लाकडाचा साठा जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी,  पेठ तालुक्यातील गुजरात सीमारेषेजवळ असलेल्या देवडोंगरी गावाजवळ खैराच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल करून हे लाकूड गुजरात राज्यात नेण्यात येणार असल्याची समजले.

त्यानुसार वनविभागाच्या गस्तीवर असलेल्या पथकाने खैराची वाहतुक करणारे वाहन अडविले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी पोबारा केला.

हरसुल व पेठच्या जंगलातून रात्रीचे वेळी हरसूल येथील वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल के.व्ही. सुर्यवंशी ,के,एस. एकशिंगे वनरक्षक एन.एस.पाटील, एम.एस. परडे, आनंदा पवार व वनमजूर रात्रीचे वेळी गस्त घालत असतांना रस्त्यावर आयशर कंपनी या डीएन ० ९, ९९२७ क्रमांकाचा टेम्पो आढळून आला.

गस्ती पथकाची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेऊन तस्कर फरार झाले. वाहनाची तपासणी केली असता त्यात बेकायदा कत्तल केलेले खैर वृक्षाचे ओंडके आढळून आले.

मालाचे मोजमाप केले असता ० .८१ घ . मी . त्याचे मुल्य ९,८०० व वाहनाचे मुल्य १ लाख ९० हजार असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विभागीय व्यवस्थापक यु. सी. ढगे, सहा .व्यवस्थापक एस.एच.वाजे यांचे मार्गदर्शनाखाली बोरीपाडाचे वनक्षेत्रपाल सी.आर.ढोबळ, झरी वनक्षेत्राचे एम.पी.जोशी, वनमजूर यांच्या प्रयत्नांनी सदर कारवाई यशस्वी करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com