Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

हरसूल : भाजीपाल्याच्या कॅरेट मधून मद्याची वाहतूक करणारे दोघे जेरबंद

Share

त्र्यंबकेश्वर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्व-भूमीवर केंद्र-शासित प्रदेश दिव-दमण, सेलवास मार्गे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यात अवैध मद्य येणार असल्याचा सुगावा हरसूल पोलिस स्टेशनला लागताच हरसूल पोलिसांनी रात्रभर सापळा रचून, पाळत ठेवत आज हरसूल जवळील शिरसगाव फाटा येथे पहाटे ०५ वाजेच्या सुमारास भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन जाणारे पिकअप वाहन क्रमांक एमएच. १५ इ. जि. ७३६५ मध्ये घेऊन त्यामध्ये विविध प्रकारच्या विदेशी मद्याचे ९० पेट्या ( दोन लाखा छत्तीस हजार किंमतिचे मद्य ) आज वाहनासह जप्त करण्यात आल्या आहेत. मद्य वाहतूक करणार्‍या वाहनाचा चालक भैरुसिंह राजपूत राहणार राजस्थान, साथीदार दीपक औचिते राहणार जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती-नुसार सदर मद्याची पिकअप दमण येथून निघाली होती व सबंधित नाशिक येथे मद्य पोचवून तिथून सुरतकडे मद्य जाणार होते. परंतु मागील कारवाईत देखील सूरत जाणारा मद्यसाठा हरसूल मार्गे नेण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. तर केंद्र-शासित प्रदेशातील स्वस्त दारू निवडणुकीसाठी पुरवणारी आंतर-राज्यीय मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे पुढील काही दिवस हरसूल परिसरात अवैध मद्य वाहतूक रोखण्यसाठी पोलिसांनी रात्रीचि गस्त, पोलिस चेक नाके आदी वाढवून बारीक लक्ष ठेवले आहे. तर जागोजागी गुप्त-हेरांद्वारे हरसूलचे पोलिस पथक बारीक लक्ष ठेऊन आहेत.

आज झालेली कारवाई नाशिकच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्टा वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी बडे, खेडूळकर एम.,एस.सी राऊत, एच.सी.मोंढे,एच. सी.बोडके, पी.एन. तुंगार,एच सी. बोंबले, पि.एन. जाधव,संदीप दुणबळे, पगार यांच्या पथकाने केली आहे. तर अधिक तपास हरसूल पोलिस करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!