Type to search

Featured जळगाव राजकीय

बोदवड पं.स.सभापतीपदी किशोर गायकवाड, उपसभापतीपदी सौ.प्रतिभा टिकारे यांची निवड

Share
Bodwad panchayat samiti

बोदवड – 

पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज दि.२ जानेवारी गुरुवार रोजी निवडसभा बोदवड तहसिल कार्यालयात बोलाविण्यात आली.

आगामी अडीच वर्षांसाठी ही निवड असून सभापती पद अनुसुचीत जातीसाठी राखीव असल्याने भाजपचे व साळशिंगी गणातून प्रथमच राजकारणात प्रवेश केलेल्या व प्रथमच निवडून आलेल्या किशोर भिमराव गायकवाड यांची वर्णी लागली असून ते सभापतीपदाचा तर उपसभापती म्हणुन मनुर गणातून निवडून आलेल्या सौ.प्रतिभा निलेश टिकारे ह्या पदभार यांनी आज स्वीकारणाला.

गेल्या अडीच वर्षांपासून येथे सभापतीपदी गणेश सिताराम पाटील व उपसभापती म्हणून सौ.दिपाली जीवन राणे होत्या. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत प्रकिया पार पडली व सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनुसूचित जात प्रवर्गातून व नव्याने स्थापन झालेल्या साळशिंगी गणातून निवडून आलेले एकमेव किशोर गायकवाड यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे.

बोदवड पंचायत समितीच्या चारही गणातून निवडून आलेले सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे असल्याने येथील पंचायत समितीवर भाजपाची एकहाती सत्ता आहे.

गेली अडीच वर्ष सभापती पद गणेश पाटील यांनी तर उपसभापतीपद सौ.दिपाली जीवन राणे यांनी पद भुषविले असल्याने पुढील अडीच वर्ष उपसभापती म्हणुन सौ.प्रतिभा निलेश टिकारे यांची वर्णी लागली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!