Type to search

Featured जळगाव राजकीय

अमळनेर : पं.स.सभापतीपदी सौ.रेखाबाई पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पाटील बिनविरोध !

Share
amalner panchayat samiti sabhapati

अमळनेर (प्रतिनिधी) –

येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या सौ.रेखाबाई नाटेश्वर पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पावभा पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.

सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती, या वेळेत या दोघांचे अर्ज असल्याने दुपारी ३ वा औपचारीक घोषणा होणार आहे.

पंचायत समितीत एकूण ८ सदस्य आहेत भाजपाचे ५ तर रा.कँ.चे ३ अशी संख्याबळ आहे. सर्वसाधारण महिला हे आरक्षण असून  रा.कँ.कडे महिला सदस्य नाहीत तिनही पूरूष आहेत तर भाजपाकडे पूरेसे संख्याबळ व उमेदवार असल्याने पून्हा भाजपाचीच सत्ता येईल हे निश्चित होते.

आ.स्मिता वाघ यांनी या पदासाठी दोन्ही नावांची घोषणा केली उर्वरित कालावधीसाठी इतरांनाही संधी मिळावी म्हणून १० महिन्यांसाठी हि निवड असल्याचे समजते पुढील सभापती पदाची संधी कविता प्रफूल पाटील यांना मिळणार असल्याचे समजते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!