Monday, April 29, 2024
HomeUncategorizedनवी दिल्ली वार्तापत्र : लवकरच लसीकरणाला सुरूवात..

नवी दिल्ली वार्तापत्र : लवकरच लसीकरणाला सुरूवात..

नवी दिल्ली l New Delhi (सुरेखा टाकसाळ) :

भारतीय बनावटीची कोविड प्रतिबंधक लस जनतेला देण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची तयारी पूर्ण झाली असून, येत्या १३ जानेवारी पासून या लसीकरणाला सुरूवात होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

उद्या कॅबिनेटच्या बैठकीत लसीकरणाच्या प्रारंभाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

सर्वप्रथम डाॅक्टर्स, नर्सेस, अन्य आरोग्य कर्मचारी, त्यानंतर सेनादले, केंद्र व राज्य पोलीस, निम सैनिकी दले, सीमा सुरक्षा दलातील कर्मचारी यांचे लसीकरण केले जाईल. त्यानंतर ५० पेक्षा अधिक वयाच्या (को माॅरबिलिटी असलेले ) व्यक्तींच्या लसीकरणाला सुरूवात होईल.

केंद्रीय आरोग्य विभागातर्फे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. करोना प्रतिबंधक दोन लशींना औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्याबद्दल नीति आयोगाचे आरोग्य सदस्य डाॅक्टर. व्ही के पाॅल यांनी समाधान व्यक्त केले. परंतु, लसीकरण सुरू होणार म्हणून आत्मसंतुष्टराहाता कामा नये व ढिलाई राखून चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोशिल्ड व भारत बायोटेक (हैद्राबाद) कंपनीच्या कोवॅक्सीन या लशींना औषध महानियंत्रकांनी ३ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे.

आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन कर्मचारी यांना लसीकरणासाठी नोंदणी करावी लागणार नाही. मात्र त्यानंतरच्या लसीकरणाच्या टप्प्यात प्राधान्याने लस दिल्या जाणाऱ्या व्यक्तींना करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी स्वत:ला अँँपवर नोंदणी करावी लागेल. मुंबई, दिल्ली, कोलकाता व कर्नाल या शहरांमध्ये या दोन्ही लशींचे डोस (बाटल्या) साठवणीसाठी खासशीतगृहे असतील.

दरम्यान, कोविड प्रतिबंधक लशींच्या सुरक्षिततेबाबत संशय व आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या