Friday, April 26, 2024
HomeUncategorizedखेळात पैसा, पैशाचा खेळ

खेळात पैसा, पैशाचा खेळ

भारताने १९७५ मध्ये अजित पाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली जागतिक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले, तर १९८३ मध्ये कपिल देव यांनी आयसीसी विश्‍वचषक (ICC World Cup) स्पर्धा जिंकली. या दोघांना भारतीय क्रीडा इतिहासात मानाचे स्थान आहे. दोन्ही विश्‍वचषक जिंकणार्‍या खेळाडूंंचे खूप कौतुक झाले, परंतु आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी त्यांंना अपेक्षेप्रमाणे पैसे किंवा बक्षीस मिळाले नाही.

हॉकी विश्‍वचषक जिंकणार्‍यांंना त्यावेळी कसबसे प्रत्येकी ५० हजार रुपये दिले. परंतु जगातील सर्वात श्रीमंत संस्था समजली जाणार्‍या बीसीसीआयची १९८३ मध्ये क्रिकेटपटूंना मालामाल करेल, अशी स्थिती नव्हती. त्यामुळे खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या कॉन्सर्टचे आयोजन करावे लागले. यानुसार खेळाडूंना एक एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

- Advertisement -

आता स्थिती बदलली आहे. जो खेळ एक एक पैशासाठी धडपड करत होता, तेथे आता पैशाचा पाऊस पडत आहे. अंडर-१९ विश्‍वचषक स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय संघाच्या खेळाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी ४० लाख रुपये देण्याची घोषणा केली. आपल्या वरिष्ठ खेळाडूंना तर या संस्थेकडून विश्‍वचषक (World Cup) स्पर्धेनंतर एक-एक कोटी रुपयापर्यंत बक्षीस देण्यात येत आहे. अर्थात हा बदल अचानक झालेला नाही. यात बीसीसीआयला श्रीमंत करण्यात दिवंगत जगमोहन डालमिया यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. १९९० मध्ये बीसीसीआयचे सचिव झाल्यानंतर त्यांनी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आणि ते असेपर्यंत मंडळ मालामाल होत गेले. अंंडर १९ ची विश्‍वचषक (World Cup) जिंकणार्‍या टिमच्या खेळाडूंना तर लाखो रुपये मिळतही नव्हते. परंतु त्यांची खरी लॉटरी आयपीएलच्या लिलावानंतर लागत लागली.

२०२० च्या अंडर १९ विश्‍वचषकात सहभागी होणारे जयसवाल, रवी बिश्‍नोई, प्रियम गर्ग आणि कार्तिक त्यागी यासारख्या खेळाडूंना गेल्यावर्षी आयपीएलच्या लिलावात कोट्यवधींची बोली लावण्यात आली. यावेळी मेगा लिलावात राज अगंद बावा, राज्यवर्धन हे कोट्याधीश बनले. विशेष म्हणजे त्यांना आयपीएलची लॉटरी देखील लागली नव्हती. तरीही घरगुती खेळातच त्यांना चांगले पैसे मिळण्याची शक्यता राहिली. क्रिकेटमध्येच पैसा आला, असे नाही. आता कबड्डी,(Kabaddi), बॅडमिंटन (Badminton), कुस्तीत (Wrestling) देखील खेळाडू बक्कळ कमवत आहेत. प्रो कबड्डी लीगमुळे गेल्या काही वर्षात खेळाडूंची स्थिती सुधारली होती.

या लीगच्या मागील लिलावात नजर टाकली तर यूपी योद्धा टीमचा प्रदीप नरवाल याला खरेदी करण्यासाठी १.६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. रोहित गलिया आणि अर्जुन देशवालसारखे खेळाडू देखील कोटी रुपयांंच्या आसपास पोचले होते. अशावेळी प्रिमियर बॅडमिंटन लीगमध्ये ताय यू यिंग आणि पी.व्ही. सिंधू यासारखे खेळाडू प्रत्येकी ७७ लाखांपर्यंत पोचले.

बॅडमिंटमध्ये देखील आता टेनिस स्पर्धेप्रमाणेच चांगली कमाई होण्याची शक्यता वाढली आहे. व्हॉलिबॉलमध्ये अजून पैसा आलेला नाही. परंतु तो कालांतराने दिसू शकतो. १९७५ मध्ये भारताने हॉकी विश्‍वविजेतेपद जिंकल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली होती. त्यानंतर भारतीय टीम आणि ऑल स्टार एलेव्हनदरम्यान काही सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. हे सामने पाहण्यासाठी मैदाने खचाखच भरले. तरीही या खेळाडूंना देण्यासाठी पुरेसे पैसे उभे राहू शकले नाही.

अर्थात २०१४ रोजी एक सोहळा आयोजित करुन या विश्‍वचषकातील विजेता खेळाडूंपैकी प्रत्येकाला पावणे दोन लाख रुपये दिले. साधारपणे क्रिकेटपटूंना मिळणार्‍या पैशावरून अन्य खेळातील खेळाडू नाराज राहतात. आयपीएल आल्यानंतर तर कमाईचे अंतर खूपच वाढले आहे. पण आयपीएलमुळे अन्य खेळातही व्यावसायिकता आणण्याचा विचार झाला. याप्रमाणे कबड्डी, बॅडमिंटन, कुस्ती, व्हॉलिबॉल मध्ये स्पर्धेचे आयोजन होऊ लागले. हॉकीतही प्रीमियर लिगची सुरवात झाली आहे. परंंतु ङ्गएङ्गआयएच प्रो लिगफ सुरू झाल्याने ही लीग बंद झाली. अन्य खेळांत क्रिकेटइतका पैसा नसला तरी खेळाडूंची पत सुधारण्यासाठी या गोष्टी चांंगल्या ठरत आहेत.

– शैलेश धारकर

- Advertisment -

ताज्या बातम्या