रशियाशी पंगा

रशियाशी पंगा

- प्रसाद वि. प्रभू

इलोन मस्क (Elon Musk) यांनी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यावर रशियावर टीका करण्यास सुरुवात केली. खरं म्हणजे कोणताही उद्योगपती तिसर्‍या कुठल्यातरी देशासाठी अशा प्रकारचे धाडस सहसा करत नाही, कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याला आपला व्यवसाय महत्वाचा असतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या यांचे जगातील बहुतेक देशांशी संबंध येत असतात. असे असताना इलोन मस्क (Elon Musk) यांनी रशियाशी व्यक्तिगत पंगा घेतला आणि युक्रेनचा पाठिंबा दिला व मदतही केली. त्यामुळे मस्क यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. युक्रेन युद्धाचा निकाल लावण्यासाठी पुतीन (Putin) यांनी आपल्याबरोबर मल्लयुद्ध खेळावे असे आव्हान इलोन मस्क यांनी केले आहे.

रशिया आणि युक्रेन ( Russia and Ukraine) यांच्यातील युद्ध लांबत चालले आहे. दोन्ही बाजूंनी जीवित आणि वित्तहानीचे दावे केले जात आहेत. मात्र युक्रेनच्या भूमिमध्ये हे युद्ध सुरू असल्यामुळे रशियन अस्त्रांनी युक्रेनचा बराच भाग बेचिराख झाला आहे. या युद्धामध्ये रशियाचे मोठे नुकसान करण्यामध्ये जगातील सर्वात धनाढ्य उद्योगपतींपैकी पैकी एक, इलोन मस्क यांची मोठी भूमिका आहे, असे सांगितल्यास कुणालाही नवल वाटेल. 'भन्नाट कल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणारा अवलिया' असे इलोन मस्क यांचे वर्णन केले जाते. ङ्गटेसला इलेक्ट्रिक कारफ आणि "स्पेसएक्स' यामुळे प्रचंड पैसा कमावलेल्या 50 वर्षीय इलोन मस्क यांनी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यावर रशियावर टीका करण्यास सुरुवात केली.

खरं म्हणजे कोणताही उद्योगपती तिसर्‍या कुठल्यातरी देशासाठी अशा प्रकारचे धाडस सहसा करत नाही, कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याला आपला व्यवसाय महत्वाचा असतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या यांचे जगातील बहुतेक देशांशी संबंध येत असतात. असे असताना इलोन मस्क यांनी रशियाशी व्यक्तिगत पंगा घेतला आणि युक्रेनचा पाठिंबा दिला व मदतही केली. त्यामुळे मस्क यांची लोकप्रियता प्रचंड वाढली.

अमेरिकेने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक अमेरिकन कंपन्यांनी रशियातील आपला व्यवसाय आवरता घेतला. मस्क यांची रशियामध्ये फारशी गुंतवणूक नाही. गेल्या वर्षी त्यांनी रशियामध्ये इलेक्ट्रिक कार (Electric car) निर्मिती कारखाना उभा करण्याची घोषणा केली होती. त्यांना रशियाच्या उद्योग मंत्रालयानेही निमंत्रण दिले होते. पण नंतर त्यांनी हा बेत बदलला होता. इलोन मस्क यांची टेसला कंपनी कार निर्मितीसाठी रुसल या रशियन कंपनीकडून ल्युमिनियम मोठ्या प्रमाणात खरेदी करते. अमेरिकेने अद्याप या रशियन कंपनीवरती बंदी घातलेली नाही. ल्युमिनियम पुरवठा करणारी जगातील ही दुसर्‍या क्रमांकाची मोठी कंपनी आहे.

इलोन मस्क यांनी रशियन लष्कराचे कसे नुकसान केले ते आपण पाहू.

युक्रेनने क्षेपणास्त्र डागून काळ्या समुद्रातील रशियन युद्धनौका ममास्कव्हाफला जलसमाधी दिल्यामुळे रशियाला मोठा धक्का बसला. ममास्कव्हाफ ही काही साधीसुधी युद्धनौका नव्हती. रशियन नौदलाच्या सामर्थ्याचे एक प्रतीक म्हणून तिची ओळख होती. ममास्कव्हाफ हे रशियाचे तरंगते संरक्षण केंद्र होते. या युद्धनौकेवर विविध प्रकारची प्रभावी क्षेपणास्त्रे होती. काही अण्वस्त्रेही या युद्धनौकेवर होती असे प्रारंभी म्हटले गेले. कारण ही युद्धनौका अण्वस्त्रवाहू होती. ती बुडाल्यामुळे या भागात किरणोत्सर्ग होईल अशी भीती व्यक्त केली गेली. ही युद्धनौका गमावल्यामुळे रशियाच्या काळ्या समुद्रातील हवाई संरक्षणाला मोठे भगदाड पडले आहे असे मानले जात आहे. ओडेसा ते क्रिमिया मधील समुद्रात ममास्कवाफ दैनंदिन गस्त घालत असे. ही युद्धनौका कशाप्रकारे बूडवण्यात आली याचा तपास रशियन सुरक्षा यंत्रणेने केला. तेव्हा त्यांना असे आढळून आले की, यामागे इलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचे युक्रेनच्या अवकाशात फिरणारे उपग्रह कारणीभूत असल्याचे दिसून आले.

या उपग्रहांच्या मदतीने युक्रेनच्या लष्कराने टारगेट फिक्स केले आणि नेपच्यून क्षेपणास्त्र डागून मास्कव्हाला जलसमाधी दिली. त्यामुळे संतापलेल्या रशियन सुरक्षा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष दमित्री मेदवेदेव यांनी रशियन प्रदेशावर तरंगणारे स्टारलिंकचे उपग्रह नष्ट करण्याचा आदेश दिला आहे. बाह्य अवकाशाचे लष्करीकरण करण्याचा रशियाचा हेतू नाही पण इतरांनाही तसे करू न देण्याचा आमचा प्रयत्न राहीलफ असे त्यांनी जाहीर केले. इलोन मस्क यांचे स्टारलाईन उपग्रह तंत्रज्ञान युक्रेनच्या ड्रोनना मदत करीत आहे. रशियन रणगाडे, चिलखती वाहने आणि शस्त्रास्त्रे नष्ट करण्यासाठी या ड्रोनचा वापर प्रभावी ठरला आहे. त्यामुळे रशियन लष्कराची मोठी हानी होत आहे. मस्कची स्टारलिंक इंटरनेटसेवा अजूनही युक्रेनच्या बर्‍याच भागांमध्ये पुरवली जात आहे. ही सेवा उद्ध्वस्त करण्यासाठी रशियन तंत्रज्ञान विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मस्कने युक्रेनमधील इंटरनेट वापरणार्‍यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

अमेरिकेने युक्रेन युद्धावरून रशियावर निर्बंध लावण्याचा सपाटा सुरू केल्यानंतर रशियन स्पेस एजन्सी ङ्गरोसकॉसमॉसफचे प्रमुख दमित्री रोगोझिन यांनी पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीवर पाडवण्यात येईल अशी धमकी दिली आहे. तशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपली ङ्गस्पेसएक्सफ कंपनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे संरक्षण करेल, अशी घोषणा इलोन मस्क यांनी केली आहे. या अंतराळ स्थानकाला यंत्रणा आणि ऊर्जा पुरविण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे. तर या स्थानकाला कक्षेमध्ये स्थिर ठेवण्याची जबाबदारी रशियाची आहे.

अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियन स्पेसचीफ दमित्री रोगोझिन यांनी अमेरिकेला रॉकेट इंजिन पुरवठा बंद करू असा इशारा दिला आहे . 1997 पासून रशियाने अमेरिकेला 122 आरडी 180 रॉकेट इंजिनचा पुरवठा केलेला आहे . त्यातील 98 इंजिनचा वापर मंगळ, शुक्र, बुध ग्रहांवरील संशोधनासाठी टलास प्रक्षेपकांच्या उड्डाणासाठी करण्यात आलेला आहे.

याबाबत इलोन मस्क यांनी दमित्री रोगोझिन यांना एका ट्विटर व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे आणखी 47 स्टारलिंक उपग्रह कक्षेमध्ये सोडण्यात आल्याची ही व्हिडिओपोस्ट आहे.

विशेष म्हणजे युक्रेन युद्धाचा निकाल लावण्यासाठी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आपल्याबरोबर मल्लयुद्ध खेळावे असे आव्हान इलोन मस्क यांनी केले आहे. अर्थात मस्क यांची ही स्टंटबाजी आहे, अशी टीका झाली. एकेकाळी पाकिस्तानी क्रिकेटपटू इमरान खान यांनी काश्मीरप्रश्नाचा निकाल क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान सामन्याने लावण्याचे आव्हान केले होते, असाच हा मस्क यांचा स्टंट आहे. ‘पुतीन यांना आव्हान देण्यापूर्वी चेचन्यामध्ये प्रशिक्षण घ्या आणि एक ठोसा कसा असतो याचा अनुभव घ्या,’अशा शब्दात पुतीन यांचे निकटवर्ती आणि चेचेन्या प्रांताचे प्रमुख रमझान खादिरोव यांनी इलोन मस्क यांची खिल्ली उडवली आहे.

‘उगाच रशियाशी पंगा घेऊ नकोस, पुतिन यांचे हस्तक तुला विष घालून मारतील,फ असा सावधगिरीचा सल्ला इलोन मस्क यांना त्यांच्या हितचिंतकांनी दिला आहे. इलोन मस्क यांनी आता ट्विटर कंपनी खरेदी करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे; तर लांबत चाललेले युद्ध आणि ‘मस्कव्हा’ ला मिळालेली जलसमाधी यामुळे घायाकुतीला आलेला संतप्त रशिया युक्रेनवर अणुबाँब टाकेल की काय आणि त्यामुळे तिसर्‍या विश्वयुद्धाचा भडका उडेल काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

युक्रेन-रशिया युद्धाला एप्रिल महिन्याअखेर दोन महिने पूर्ण होतील. या दरम्यान युक्रेनमध्ये 1400 लोक ठार झाल्याचे युक्रेन सरकार आणि युनोने जाहीर केले आहे.

- ज्येष्ठ पत्रकार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com