424 शिक्षकांना पदस्थापनेचे आदेश

0

रविवारी जिल्हा परिषदेत बसून अशोक कोल्हे यांनी काढले आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकार पातळीवर तयार करण्यात आलेल्या रोष्टरनूसार जिल्ह्यात 621 आंतरजिल्हा बदलीने प्राथमिक शिक्षक येणार आहेत.
यातील 428 शिक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यातील 424 शिक्षकांना समुदेशनाने नेमणुकीचे ठिकाण दिलेले आहे. या सर्व शिक्षकांच्या पदस्थापनेच्या ऑर्डरवर रविवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी स्वाक्षरी केल्या.
आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदल्याचे रोष्टर चालूवर्षी राज्य पातळीवरून तयार करण्यात येवून रिक्त जागांनूसार त्यात्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना समावून घेण्यात आले.
नगर जिल्ह्यात रिक्त जांगाच्या अहवालानूसार 621 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेने नगरला पाठवण्यात येणार आहे. यातील 428 शिक्षक 18, 19 आणि 27 तारखेला नगर जिल्हा परिषदेत दाखल झाले असून यापैकी 424 शिक्षकांच्या पदस्थापनेच्या ऑर्डर काढण्यात आल्या आहेत.

  आज सोमवारी पुन्हा 23 शिक्षकांना समुपदेशनाने जिल्ह्यात रिक्त असणार्‍या जागांवर समावून घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. साधारण 60 ते 80 आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांनी अंशता: बदलाची मागणी जिल्हा परिषदेकडे केली असून त्यावर नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*