नियोजनच्या बैठकीला अभूतपूर्व बंदोबस्त

0

जिल्हा परिषद सदस्यांची भीती, लोकप्रतिनिधींना विश्‍वास न घेतल्या अधिकार्‍यांवर कारवाई  : ना. विखे

जिल्हा नियोजनसाठी   351 कोटींचा आरखडा, जिल्हा नियोजनसाठी   351 कोटींचा आरखडा, संगमनेेर, श्रीरामपूर, पारनेरातील चार यात्रास्थळांना क वर्ग, गतवर्षी निधी खर्च करण्यात नगर राज्यात अव्वल,  शेवगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र घोटण येथे स्थलांतरीत होणार, उचलसंबंधित अडचणी तातडीने राज्य सरकारच्या कोअर कमीटीकडे 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीत जिल्हा परिषदेचे 33 जागा रिक्त असतांना पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी नियोजन समिती बैठक बोलावली. या बैठकीच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य गोंधळ घालतील या भितीपोटी महसूल प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयावर अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्याची वेळ आली. यावेळी खासदार, आमदारांच्या गाड्यासह नियोजन समितीच्या सदस्यांना आपली ओळख पटवून प्रवेश देण्यात आला.

तर बैठकीत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचा बोलबाला असल्याची माहिती अधिकार्‍यांकडून मिळाली. जिल्हा नियोजन समितीच्या 36 जागा रिक्त आहेत. यात एकट्या जिल्हा परिषदेच्या 33 सदस्यांचा जागा असून उर्वरित 3 जागा या नगरपालिकांचे प्रतिनिधींच्या आहेत. असे असतांना पालकमंत्री शिंदे यांना असणार्‍या अधिकारात त्यांनी नियोजन समितीची बैठक बोलावली.

या बैठकीवरून पालकमंत्री शिंदे विरोधात जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. याची कुणकूण पालकमंत्री शिंदे यांना लागताच त्यांनी पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. त्यानूसार सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशव्दारावर पोलीसांनी ताब्यात घेतले.

शिर्घकृती दलाच्या तुकडीसह मोठा पोलीस ङ्गौजङ्गाटा या ठिकाणी तैनात होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश घेण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांना आपले ओळखपत्र दाखवण्याची वेळ आली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्‍न घेवून आलेल्या अभ्यंगतांना सायंकाळी पाचनंतर येण्यास सांगण्यात आले.

दुपारी एक वाजता नियोजन समितीच्या सभेला सुरूवात झाली. सभेला पालकमंत्री शिंदे, विरोधी पक्षनेते विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे, खा. दिलीप गांधी, महापौर सुरेखा कदम, आ. संग्राम जगताप, आ. शिवाजी कर्डिले, आ. विजय औटी, आ. स्नेहलता कोल्हे, आ. वैभव पिचड, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. मोनिका राजळे, आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

सुरूवातीला नियोजन समितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर निधीचे पुर्ननियोजन विषय सुरू असतांना वन विभागाचा विषय निघाला. त्यावर आ. औटी यांनी वन विभागाकडे वृक्ष लागवडीचे नियोजन नसल्याचे स्प केले. त्यावर विखे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक ए. लक्ष्मी यांच्याकडे विचारणा केली. त्यावर लक्ष्मी यांनी विखे यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला थेट उत्तर देण्याऐवजी दुसरीच माहिती सांगण्यास सुरूवात केली.

त्यावर विखे यांनी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेवून वन विभाग काम करते का? असा सवाल विचारला. त्यावर लक्ष्मी यांनी पुन्हा तोच प्रकार केला. अखेर संतप्त झालेल्या विखे यांनी अधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधींना विश्‍वासत घेवून कामे करावीत. कोणावरही कारवाई करण्याची वेळ येवू देवू नका, या शब्दात कानपिचक्या दिल्या. तत्पूर्वी सकाळी शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री शिंदे, विरोधी पक्ष नेते विखे आणि जिल्ह्यातील आमदारांची गुप्तगू झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होते. या बैठकीमुळे नियोजन समितीच्या बैठकीचा नूरच बदला असल्याचे सांगण्यात आले.

………….
सभेत राहुरी तालुक्यातील वावथर जांभळी येथे वीज उपकेंद्र सुरू करण्यासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करून न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. यासह शहरातील सिंग्लन, सीना नदीतील अतिक्रमण, सीनातील दुषीत पाणी प्रश्‍नावर खा. गांधी यांनी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री शिंदे यांचा सत्कारही करण्यात आला.
………….
राज्य सरकारकडून येणार्‍या काही विभागाचा निधी कोणत्या लोकप्रतिनिधींनी खर्च करावेत, याचे निकष ठरलेले आहेत. मात्र, काही निधी आमदार अथवा जिल्हा परिषद सदस्यांनी खर्च करावा याबाबत स्पता नाही. यामुळे राज्य सरकारकडून आलेल्या इतर जिल्हा मार्गाचा निधी खर्च करण्यावरून तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकार्‍यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आमदार आणि जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेवून त्यातून मार्ग काढण्यात येणार आहे. हा मार्ग काढण्याची जबाबदारी पालकमंत्री शिंदे यांवर सोपवण्यात आली आहे. हा ठराव आ. कर्डिले यांनी मांडला होता. त्यास आ. औटी यांनी अनुमोदन दिले.

……………

 

LEAVE A REPLY

*