जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांची जत्रा

0

आंतरजिल्हा 413 शिक्षकांना आज मिळणार नेमणुका

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून नगर जिल्हा परिषदेत 413 प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेले आहेत. या शिक्षकांमुळे सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शिक्षकांची जत्राच भरली होती. दरम्यान, आज मंगळवारी या शिक्षकांना रिक्त असणार्‍या ठिकाणावर नेमणुका देण्यात येणार आहेत. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांची संख्या मोठी असल्याने जिल्हा परिषदेच्या सभागृहाऐवजी सहकार सभागृहात समुपदेशनाने या शिक्षकांना नेमणुका देण्यात येणार आहेत.
गेल्या दहा वर्षापासून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा विषय प्रलंबित होता. राज्य पातळीवर साधारण 21 हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी नोंदणी केली होती. त्यानूसार गेल्या आठवड्यात जिल्ह्यात 104 शिक्षकांना समावून घेण्यात आले आहेत. आता पुन्हा 413 शिक्षक सोमवारी नगरमध्ये आले असून त्यांना जिल्ह्यात रिक्त असणार्‍या ठिकाणी नेमणुका देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत दाखल झालेल्या शिक्षकांना त्यांच्या सेवाज्येष्ठ अथवा जिल्हा परिषदे हजर करून घेतलेल्या तारखेनूसार प्राधान्यांने रिक्त जागा दाखवून शाखा निवडण्याची संधी देण्यात यावी, या मागणीसाठी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपाध्यक्षा राजश्री घुले यांची भेट घेतली.

14 प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी अनुकूलता दाखवली आहे. या प्रकल्पग्रस्तांची फाईलची छानणी पूर्ण झाली असून प्रकल्पग्रस्तांना न्याय न दिल्यास जिल्हा परिषदेचे गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी दिला होता. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या गलथ कारभारामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हे यांना या प्रकल्पग्रस्तांना नेमणुका देण्याचे अधिकार नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.व्ही. माने हजर झाल्यानंतर या शिक्षकांना नेमणुका देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आज देण्यात येणार्‍या नेमणुकांमध्ये विधाव, परित्यागत्या, कुमारीका, गंभीर आजाराने पिडीत, मतीमंद मुलांचे पालक यांना प्रधान्य देण्यात येणार आहे. हे ज्या शिक्षकांना मान्य नसले त्यांनी खुशाल न्यायालयात जावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हे यांनी ठणकावून सांगितले. दिवसभर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग शिक्षकांच्या गर्दीने भरलेला होता.

LEAVE A REPLY

*