Type to search

Featured सार्वमत

1 हजार 623 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

Share

ऑनलाईन बदल्या : शंभर शिक्षक विस्थापित

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे बदलीचे आदेश शनिवारी रात्री जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगणकीय प्रणालीतून बदली झालेल्या शिक्षकांची आकडेवारी प्राथमिक शिक्षण विभागाला रविवारी दुपारी मिळाली. त्यात मराठी माध्यमातील 1 हजार 584 तर उर्दू माध्यमातील 39 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. 20 पर्यायी शाळांची नावे सुचवूनही त्या शाळा न मिळाल्याने 100 शिक्षक विस्थापित झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया राबविली. यंदा बदलीसाठी पात्र असणार्‍या प्राथमिक शिक्षकांची संख्या 3 हजार 285 होती. गेल्या वर्षी जिल्ह्यात विक्रमी 6 हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. मात्र, एकादा बदली झाल्यानंतर तीन वर्षे बदली होत नसल्याने यंदा निम्म्याने बदली पात्र शिक्षकांची संख्या खाली आहे. जिल्ह्यात अवघड क्षेत्रातील 368 शाळा असून महिलांसाठी घोषित केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या 341 होती. बदलीसाठी सलग 10 वर्षे सेवा आणि एका शाळेवर 3 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांची संख्या 2 हजार 63 असून अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची संख्या 432, तर उर्दू माध्यमात सलग 10 वर्षे सेवा आणि एका शाळेवर 3 वर्षे झालेल्या शिक्षकांची संख्या 76 होती. याच माध्यमातील अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची संख्या 5 होती. यातून ग्रामविकास विभागाने एनआयसीच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी माध्यमातील 1 हजार 584 तर उर्दू माध्यमातील 39 शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात शंभर शिक्षक हे विस्थापित झाले आहेत. आजपासून शाळा सुरू होणार असून बदली झालेल्या शिक्षकांना आजच बदलीच्या शाळेवर हजर व्हावे लागणार आहे.

अशा आहेत बदल्या
संवर्ग 1 विशेष सवलत- 280, संवर्ग 2 पती-पत्नी एकत्रिकरण 266, संवर्ग 3 अवघड क्षेत्रात काम केलेले- 106, संवर्ग 4 सर्वसाधारण- 932 अशा एकूण-1 हजार 584 सर्व मराठी माध्यम. उर्दू माध्यम : संवर्ग 1-10, संवर्ग 2-9, संवर्ग 3- शुन्य आणि संवर्ग 4- 20 अशा एकूण- 39 यांचा समावेश आहे. तर विस्थापित शिक्षक (20 पर्यायापैकी शाळा न मिळालेले)- 100 यांचा समावेश आहे.

विस्थापित सीईओंच्या कोर्टात
जिल्ह्यात विस्थापित होणार्‍या शिक्षकांच्या बाबत निर्णय घेण्याचे अधिकार यंदा राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविले आहेत. यामुळे बदली संवर्ग 5 संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी समुपदेशनाने रिक्त असणार्‍या ठिकाणी या विस्थापितांना नेमणुकीची शाळा देणार आहेत.

यंदाच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण 30 किलो मीटरच्या आत परिघात शाळा घेणे बंधनकारक असताना काही शिक्षकांनी चुकीची माहिती देऊन 40 कि.मी ते 50 कि.मी अंतरावरील शाळा घेतल्या आहेत. यामुळे यंदा देखील काही प्रमाणात शिक्षकांच्या बोगस बदल्या झाल्या असून त्या शोधण्याचे आव्हान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!