Type to search

Featured सार्वमत

शनिवारपर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या?

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तब्बल तीन हजार 285 शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्यात येणार आहे. यामध्ये दोन हजार 215 उपाध्यपक, 280 पदवीधर व 81 मुख्याध्यापकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत बदल्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. 17 जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार असल्याने 15 जूनपर्यंत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी राज्यभरात एकाचवेळी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या होत्या. यावर्षी सुरुवातीला शिक्षकांच्या बदल्या होणार नसल्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र लोकसभेच्या निकालानंतर बदल्या करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करून, हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत.

जिल्ह्यात अवघड क्षेत्रात 368 शाळा आहेत. त्यामध्ये महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित केलेल्या 341 शाळा आहेत. सलग सेवा 10 वर्षे व एकाच शाळेवर तीन वर्षे मराठी माध्यमात झालेल्या शिक्षकांची बदली होणार आहे. त्यात एक हजार 761 उपाध्यपक, 230 पदवीधर व 71 मुख्याध्यापकांचा समावेश आहे. अवघड क्षेत्रात मराठी माध्यमात तीन वर्षे काम पूर्ण झालेले 390 उपाध्यपक, 36 पदवीधर व सहा मुख्याध्यापक आहेत. त्यांचीही बदली होऊ शकते. सलग सेवा 10 वर्षे व एका शाळेवर तीन वर्षे उर्दू माध्यमात झालेल्या 59 उपाध्यपक, 14 पदवीधर व तीन मुख्याध्यापक आहेत. अवघड क्षेत्रात उर्दू माध्यमात तीन वर्षे काम केलेल्या पाच शिक्षकांच्याही बदल्या करण्यात येणार आहेत. बदल्या होणार्‍यांची संख्या पाहिल्यास दोन हजार 215 उपाध्यापक, 280 पदवीधर व 81 मुख्याध्यापकांची संख्या आहे. राज्य पातळीवरून शिक्षकांच्या बदल्यांची यादी प्रसिद्ध होणार असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे शिक्षकांना त्यांच्या बदल्यांचे आदेश बजावतील.

15 जून रोजी शाळा सुरू होत असतात. मात्र शनिवार असल्याने सोमवारी 17 जून रोजी शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांना बदल्यांचे आदेश मिळणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया ही संबंधित शिक्षकाने ऑनलाईन भरलेल्या माहितीवर आधारित असून, त्याने चुकीची माहिती भरल्याचे लक्षात आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
-विश्वजीत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!