Type to search

Featured सार्वमत

प्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे आदेश राज्य पातळीवरून निघाले आहेत. बदली पात्र शिक्षकांनी भरलेल्या माहितीच्या आधारे एनआयसीच्या पोर्टलवरून ऑनलाईन माध्यमातून या बदल्या होणार आहेत. सद्यस्थितीत शिक्षकांच्या बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगणक यंत्रणेत आले आहेत. आज रविवारी सकाळी 11 नंतर आदेश वाटप पंचायत समितीत होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी दिली. जिल्ह्यात बदली पात्र शिक्षकांची संख्या सव्वादोन हजार आहे. यात 1722 नियमित बदली पात्र तर 267 अवघड क्षेत्रातील बदली होणारे शिक्षक आहेत. संवर्ग एक व संवर्ग दोन मधील बदली पात्र किती शिक्षकांनी अर्ज भरले आहेत, हे बदलीच्या आदेशानंतर समजणार आहेत. राज्यात सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्याचे आदेश निघाले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार ग्रामविकास विभागाला शाळा सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. शनिवारी दुपारपर्यंत राज्यातील सात जिल्ह्यात बदली आदेश पोहचले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!