Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सटाणा : तरसाळी फाट्याजवळ भीषण अपघात; जि. प. शिक्षकाचा जागीच मृत्यू

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विंचूर-प्रकाशा महामार्गावरील तरसाळी फाट्याजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  मोपेड आणि दोन ट्रक यांच्यात हा अपघात झाल्याने काही काळ याठिकाणी वाहतूक खोळंबली होती.

अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव पोपट नामदेव निकम असे असून ते तालुक्यातील भंडारपाडा येथील रहिवाशी असल्याचे समजते.  निकम हे दर्हाने (ता. बागलाण) येथील नंदनवन या जिल्हा परिषद शाळेतून आपल्या मुळ गावी मोपेड दुचाकीने निघाले होते.

रात्री आठ वाजेच्या सुमारास ते तरसाळी फाटा येथून जात असताना ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. अपघातात निकम रस्त्यावर दुचाकीसह कोसळले. तोच पाठीमागून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. या घटनेत निकम यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी सटाणा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!