Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

24 तास आरोग्यसेवा द्या

Share

वैद्यकीय अधिकार्‍यांना झेडपीची सूचना

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या विविध भागांत साथीच्या आजारांची लागण झाली आहे. याची दखल झेडपीच्या आरोग्य समितीने घेतली असून सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहून रुग्णांसाठी 24 तास आरोग्य सेवा पुरवाव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
उपाध्यक्षा तथा आरोग्य समितीच्या सभापती राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली काल आरोग्य समितीची बैठक पार पडली. त्यात त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

यावेळी साथरोग नियंत्रण कार्यक्रमाचा सखोल आढावा घेण्यात आला. आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत दैंनदिन सर्वेक्षण, कंटेनर पाहणी, धूर फवारणी, शाळांमध्ये प्रार्थनेच्यावेळ विद्यार्थ्यांना डासांमार्फत परसणार्‍या आजारांविषयी माहिती देणे तसेच डासअळी प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. कुटुंबकल्याणचे 53 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ते 100 टक्के करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित शिबिरांचे आयोजन करण्यासही सांगण्यात आले आहे.

या बैठकीस सदस्य सोमनाथ पाचारणे, रामभाऊ साळवे, सीताराम राऊत, पंचाशीला गिरमकर, कविताताई लहारे, सविताताई अडसुरे, पुष्पाताई वराळ, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!