Type to search

Featured सार्वमत

झेडपीचे नऊ लाख विद्यार्थी भरणार पालकांचे मतदान संकल्पपत्र

Share

लोकसभा निवडणूक : मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी) – येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग पातळीवरून वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा जिल्ह्यातील नऊ लाख विद्यार्थी त्यांच्या पालकांकडून मतदान करण्याचे सुमारे 18 लाख संकल्पपत्र भरून घेणार आहेत. याबाबतचे आदेश गुरुवारी शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे आणि लक्ष्मण पोले यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना काढले आहेत. लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत मतदान जाणीव आणि जागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांना संवैधानिक, कायदेशीर तरतुदीची माहिती देणे, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग याची माहिती देणे, निवडणूक प्रक्रियेबाबत अवगत करणे, तसेच महिला, वृध्द, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत मतदानाबाबत जागृती करण्यात येत आहे.

यानुसार आपल्या जिल्ह्यात असणारे विद्यार्थी संकल्पपत्राच्या माध्यमातून आपल्या पालकांना लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेणार आहेत. यासाठी नऊ लाख विद्यार्थी त्यांच्या 18 लाख पालकांचे संकल्पपत्र लिहून घेणार आहेत. भरून घेणार्‍यात येणारे मतदान संकल्पपत्र शाळा स्तरावर संकलित करून ठेवण्यात येणार आहेत. या संकल्प पत्रात विद्यार्थ्यांचे पालक हे आम्ही भारताचे नागरिक असून लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाहीचे जतन करत मुक्त आणि नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू. तसेच शेजारी राहणारे, मित्र परिवार यांना मतदान करण्यास प्रवृत्त करू असे संकल्प करणार आहेत. या संकल्पपत्रावर आईवडील यांची नावे, सही, पत्ता, मोबाईल नंबर द्यावयाचा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!