Type to search

maharashtra जळगाव

जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीला स्थगिती

Share

जळगाव  – 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी दि. 21 रोजी निवड ठेवण्यात आली होती. तर दि. 23 रोजी विषय समित्यांचे सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर झाला होता.

त्यानंतर प्रचलित कार्यपध्दतीनुसार आवश्यक ती सूचना निर्गमित करुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती या पदांच्या निवडणुकांबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी गुरुवारी सायंकाळी पारीत केले.

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका 23 ऑगस्ट अन्वये 120 दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या आदेशांन्वये 120 दिवसांचा कालावधी हा दि. 20 डिसेंबर 2019 रोजी समाप्त होत असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या विषय समित्यांचे सभापती व पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती या पदाच्या निवडणुकीबाबत योग्य  ती कारवाई करण्याबाबत संदर्भ क्र. 2 अन्वये कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने कार्यालयाकडील संदर्भ क्र. 1, 4, 5 व 6 अन्वये जिल्हा परिषद जळगाव येथील

अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार विषय समित्यांची निवडणुक दि. 21 व 23 डिसेंबर ही निश्चित करण्यात आली होती. तसेच जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती यांची निवडणूक घेण्यासाठी दि. 20 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

तथापी संदर्भ क्र. 3 अन्वये ग्रामविकास विभागाचे उपसचिव मंत्रालय, मुंबई यांच्याकडील दि. 10 डिसेंबर रोजीच्या सुधारीत पत्रानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सभापती पदाच्या निवडणुका सन 2019 च्या महाराष्ट्र अध्यादेश क्र. 22, दि. 23 ऑगस्ट 2019 अन्वये 120 दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

तरी या अध्यादेशांन्वये 120 दिवसांचा कालावधी हा 20 डिसेंबर रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर प्रचलित कार्यपध्दतीनुसार आवश्यक ती नोटीस निर्गमित करुन जिल्हा परिषदेचे, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती, पंचायत समिती, सभापती, उपसभापती या पदाच्या निवडणुकीबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी जिल्हा परिषदेला दिले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!