Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अवघ्या पाऊण तासात 37 विषयांना मंजुरी

Share

जिल्हा परिषदेची तहकूब सभा : शाळा खोल्या अन् पाचवीच्या वर्गाचा विषय गाजला

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेची 27 जूनला सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा सोमवारी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी अवघ्या पाऊण तासात सभागृहाने विषय क्रमांक 3 ते 28 आणि ऐनवेळच्या 30 क्रमांकाच्या विषयातील 12 विषय अशा 37 विषयांना एकमुखाने मंजुरी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा परिषदेत ही सर्वसाधारण सभा पार पडली. दुपारी 1 वाजता सुरू झालेल्या या सभेत आरोग्य विभागाच्या वतीने नेमणूक करण्यात येणार्‍या 70 वाहन चालकांची ई निविदेद्वारे नेमणूक करण्यात यावी, चालकांचे देयक रुग्णकल्याण समितीतून देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. या विषयावर जालिंदर वाकचौरे, हर्षदा काकडे आणि अध्यक्षा विखे यांनी चर्चा केली. त्यातच महिला बालकल्याण विभागातील पेसांतर्गातील जागा रिक्त का ठेवल्या हा विषय वाकचौेरे यांनी उपस्थित केला.

ऐनवेळच्या विषया निंबोडीच्या शाळा खोल्याचा विषय उपस्थित होताच सदस्य एसएम कातोरे यांनी जिल्ह्यात शाळा खोल्यांचा गंभीर विषय आहे. रस्ते, बंधार्‍यांची कामे मागे ठेवा, आधी शाळांना खोल्या द्या अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षा विखे यांनी केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानातून शाळा खोल्यांसाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. काकडे यांनी साई संस्थाच्या निधीचे काय झाले याबाबत विचारणा केली. त्यावर जालिंदर वाकचौरे यांनी या प्रश्‍नी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे सांगताच कातोरे यांनी मंत्र्यांचे सांगू नका निधीचे काय ते सांगा असा प्रतिप्रश्‍न केला.

त्याचवेळी कधी न बोलणार्‍या उपाध्यक्ष राजश्रीताई घुले यांनी शाळा खोल्यांचा विषय संपूर्ण जिल्ह्यातील आहे, असे सुनावले. त्यावर कातोरे यांनी जिल्ह्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला असल्याचे म्हणताच राजेश परजणे यांनी बोजवारा शब्द मागे घेण्याच्या सूचना कातोरे यांना केल्या. त्या कातोरे यांनी शाळांचे वीज जोड वितरणने तोडले असल्याचे सांगत ते कधी जोडणार अशी विचारणा केली. त्यावर अध् यक्षा विखे यांनी ग्रामपंचायतीने तातडीने विजेचे बिल भरण्यास प्राधान्य द्यावे, असे आदेश दिले.

त्याच काकडे यांनी एकीकडे शाळा खोल्या नाहीत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करून माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकांना कशासाठी अडचणी आणता असा प्रश्‍न केला. त्यावर परजणे यांनी त्यास उत्तर दिले. प्राथमिक शिक्षणाची व्याख्या 1 ते 5 वी असून आता शिष्यवृत्तीची परीक्षा पाचवीला होत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीचा वर्ग आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यावर काकडे यांनी माध्यमिक शाळामधील अनुदानित शिक्षक अतिरिक्त झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद घेणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला.

शेवगाव तालुक्यात एका ठिकाणी नातेवाईकांना वाचविण्यासाठी जि. प. शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आल्याचा आरोप केला. हा आरोप उपाध्यक्ष घुले यांनी फेटाळा. त्यावर पाचवीचा वर्ग सुरू करण्याचा निर्णय संबंधीत शाळेने घ्यावा, असा चर्चेनंतर सुरू निघाला. यावेळी सदस्य डॉ. किरण लहामटे, माधवरा लामखडे, सभापती रामदास भोर चर्चेत सभा घेतला. सभेत पाऊण तासात 3 ते 28 आणि ऐनवेळच्या 30 क्रमांकाच्या विषयातील 12 विषय असे 37 विषयांना एकमुखाने मंजूरी दिली.

एरवी सर्वसाधारण सभेत फारसे न बोलणार कातोरे कालच्या सभेत चांगलेच आक्रमक होते. त्यांनी शाळा खोल्यांच्या विषयावर बोलण्याची एकही संधी सोडली नाही. तर सभेत उपाध्यक्ष घुले देखील या विषयावर तावातावाने बाजू मांडतांना चमकल्या. संगमनेरचे सीताराम राऊत देखील महिला बालकल्याणच्या विषयावर आक्रमक होते. मात्र, या सभेत पक्षीय मतभेद बाजूला सारून सदस्य चर्चा करताना दिसले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!