Type to search

ब्लॉग सार्वमत

Blog : सुतावलेल्या झेडपीसमोर दुष्काळाचे आव्हान !

Share

10 मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आणि जिल्ह्याच्या मिनीमंत्रालयात अधिकारी राज सुरू झाले. जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि अधिकारी अशी दोन विकासाची चाके आहेत. पण निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पदाधिकारी आणि सदस्यांवर बंधन आले. याच दरम्यान जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत गेली. यावर उपाययोजन करण्याचे काम सुरू असतांना निवडणुकीच्या कामाचा ताण वाढला. पर्यायाने जिल्हा परिषदेच्या नियमित कामांचा वेग मंदावला. दुष्काळात प्रमुख्याने पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे नियोजन करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या खांद्यावर होते. पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजुरीचे अधिकार महसूल प्रशासनाला असले तरी पाण्याचा टँकर निघाल्यानंतर तो नियोजित ठिकाणी पोहचतात की नाही, हे पाहण्याचे काम जिल्हा परिषदेचे असते.

यामुळे गेल्या 45 दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभाग आणि पशूसंवर्धन विभाग वगळता अन्य विभागात फारसे कामच नव्हते. पर्यायाने जिल्हा परिषदेची गती संथ होत गेली. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्याने निवडणूक आयोगाने दुष्काळी कामासाठी आचारसंहिता शिथील केली. याच काळात पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेत दुष्काळ निवारणार्थ बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना बोलविणे टाळले.

दुसरीकडे या बैठकीनंतर जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष सर्वसाधारण सभा बोलावली. पण बैठकीला जिल्हा परिषदेचे जवळपास सर्वच अधिकारी गैरहजर होते. निवडणुकीची कामे असणार्‍या अधिकार्‍यांना आचारसंहिता संपेपर्यंत अन्य कोणतेही काम देण्यात येवू नयेत, असे आदेश असल्याने या अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या बैठकीला येता आले नाही. यामुळे या बैठकीतून काही आऊटपूट निघाले नाही. एकूण निवडणूक आचारसंहितेच्या काळात जिल्हा परिषदेतील अपवाद वगळता अन्य विभाग ठप्प झाल्याचे चित्र होते. आता निवडणुकीचा निकाल लागला आहे. येत्या सोमवारपासून नियमित कामकाजाला सुरूवात होणार असून यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून सुस्तावलेल्या जिल्हा परिषदेचा गाडा रूळावर येईल, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील जनतेला आहे. शेवटच्या टप्प्यात दुष्काळी लढा देणार्‍या ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करू या..!

– ज्ञानेश दुधाडे
 7720020009.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!