Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

झेडपीत 65 लाखांचा डांबर घोटाळा

Share

श्रीरामपूरचा ठेकेदार जुनेद शेख याने एकच चलन दाखवून फसवणूक केल्याचा ठपका

अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामांचा ठेका घेणारा श्रीरामपूर येथील ठेकेदार जुनेद कलीम शेख याने बनावट कागदपत्रे तयार करून एकाच डांबराचे चलन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून शासनाची 60 ते 65 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या तपासणीत समोर आले. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कंत्राटदार याचा जिल्हा परिषदेकडे नोंदणी असणारा कंत्राटदाराचा परवाना रद्द करत, त्याला नोटीस काढली आहे. शेख याचा खुलासा आल्यानंतर त्याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

श्रीरामपूर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामे घेणारे ठेकेदार यांच्या विरोधात अशोक केशवराव मुंडे यांनी तक्रार करत त्यांनी केलेल्या डांबरीकरणाच्या कामाची चौकशीची मागणी केली होती. त्यानूसार जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिणेचे कार्यकारी अभियंता यांनी शेख यांनी केलेल्या कामाची चौकशी केली. या चौेकशीत जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणार्‍या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी शेख यांनी 177.32 मेट्रीक टन डांबर खरेदी केल्याचे दिसून आले. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागात येणार्‍या सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 221.96 मेट्रीक टन डांबराचा वापर झाल्याचे दिसत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर अंतर्गत केलेल्या पाहणीत रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदार शेख यांनी नव्याने डांबर खरेदी केलेले दिसत नाही. येथील कामे करण्यासाठी 229.96 मेट्रीक टन डांबरचा वापर केल्याचे दिसत आहे.

शेख यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यास त्यांनी संगमनेरच्या कामात 229. 65 आणि जिल्हा परिषदेकडील कामात 44.64 मेट्रीक टन असे 274.29 मेट्रीक टनाची तफावत दिसत आहे. शेख यांनी वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामात एकाच डांबर खरेदीच्या चलनाचा वापर करून स्वत:चा लाखो रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी 60 ते 65 लाख रुपयांची शासनाची फसवणू केली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियत्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांना सादर केला आहे.

भोर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग उत्तरेचे कार्यकारी अभियंता यांना कंत्राटदार शेख यांना नोटीस देऊन त्यांच्या खुलाशानंतर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रस्त्यांच्या कामात डांबर घोटाळा करून शासनाची आर्थिक फसवणूक करणार्‍या शेख यांचे जिल्हा परिषदेकडील कंत्राटदारीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.

मुदत संपल्यानंतरही शेख यांनाच ठेका
2014 ते 2017 या कालवधीनंतर शेख यांची जिल्हा परिषदेकडील कंत्राटदार नोंदणीची मुदत संपली होती. मात्र, बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांनी 2018 पर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभाग वैयक्तिक कंत्राटदार वर्ग म्हणून पात्र राहिला. याबाबत अशोक मुंडे यांनी तक्रार केली होती. चौकशीत त्यात तथ्य आढळले आहे.

कॉलेटी कंट्रोलची बनावट प्रमाणपत्र
काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी वापरण्यात येणार्‍या साहित्याची गुण नियंत्रण चाचणी अहवाल बंधनकारक आहे. गुणनियंत्रण चाचणी अहवाल मिळण्यासाठी संबंधीत कंत्राटदाराला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात शुल्क भरून चाचणी करून घ्यावी लागते. मात्र, शेख यांनी संबंधीत कार्यालयाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे कामांचे बिल पास करून घेतले असल्याचे तपासणी समोर आले आहे.

दहा बनावट चलनाचा वापर
जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि संगमनेर येथील रस्त्याच्या कामांपैकी 10 डांबर चलनचा वापर दोन्ही वापर केलेला आहे. तर शेख यांनी आपल्या खुलाशात जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांना डांबराचे परिणाम कमी असल्याने प्रत्येक कामास मूळ चलन लावणे शक्य नसल्याचे नमुद केलेले आहे. तसेच मनुष्यबळ कमी असल्याने नजर चुकीने झेरॉक्सच चलनाची प्रत जोडण्यात आल्याची नमुद केलेली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!