अशोक कोल्हे जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ

0

महिनाभरासाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी माने प्रशिक्षणाला

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर अकोले जिल्हा परिषदेतून बदलून आलेले विश्‍वजीत माने हे एक महिन्यांच्या शासकीय प्रशिक्षणाला गेलेले असल्याने एक महिन्यांसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांच्याकडे पदभार राहणार आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्तांनी लेखीपत्र पाठवून तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी चारच्या सुमारास बिनवडे यांनी आपल्या पदाची सूत्रे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हे यांच्याकडे सुपूर्त केली आहेत. 2 वर्षांपूर्वी बिनवडे नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदलून आले होते.
त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून अनेक वर्षांपासून रखडलेला प्राथमिक शिक्षकांच्या बिंदूनामावलीचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. यासह गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इस्त्रोवारीसाठी पाठविण्यात आले होते.
गेल्या आठ-दहा वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा प्रश्‍न बिनवडे यांच्या कार्यकाळात पूर्ण झाला असून अनुकंपा पात्र कर्मचार्‍यांना बुधवारी नेमणुकीचे आदेश दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांच्या बदलीवरील आदेशाला असणारी स्थगिती उठली असल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*