Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

44 दिवसानंतर सीईंओ पाटील यांनी स्वीकारला पदभार

Share

अहदमनगर (प्रतिनिधी)- अविश्‍वास ठरावामुळे बदली झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्या जागी 7 ऑगस्टला बदलीची ऑर्डर झालेले एस.एस. पाटील यांनी 44 दिवसांनंतर गुरूवारी आपला पदभार स्वीकारला. पाटील मुंबईला सिडकोत कार्यरत होते. त्याठिकाणी असणार्‍या सर्व जबाबदार्‍या पूर्ण केल्यावर ते गुरूवारी नगर जिल्हा परिषदेत रुजू झाले. त्यांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आणि अन्य अधिकार्‍यांनी स्वागत केले.

मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणारे पाटील हे सध्या सिडको या ठिकाणी मुंबईत कार्यरत होते. पंतप्रधान आवास योजनेची महत्वाची जबाबदारी पाटील यांच्या खांद्यावर होती. ती पूर्ण केल्यावर त्यांना बुधवारी (दि.18) ला कार्यमुक्त करण्यात आले होते. पाटील यांचे वडील कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण त्या ठिकाणी पुढे पद्वीचे शिक्षण महात्मा फुले विद्यापिठात झालेले आहे. पाटील यांनी आतापर्यंत मंत्रालयस्तरावरच काम केले असून जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी पदावर काम करण्याचा त्यांचा पहिलाच अनुभव आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्यावरील अविश्‍वास ठराव यामुळे प्रशासन आणि पदाधिकारी- सदस्य यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्यासोबत एकत्रित काम करण्याबाबत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मी मंत्रालयात काम केलेले आहे. तसेच वरून आता खाली काम करण्यास आलेला आहे. यामुळे सर्वांना सोबत आणि विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचा विश्‍वास यावेळी व्यक्त केला.

गुरूवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी प्रभारी भोर यांच्याकडून पदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके डॉ. सुनिल तुंबारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!