माने झेडपीचे नवे सीईओ

0

मनपा आयुक्तपदी मांगळे

अहमदनगर (प्रतिनिधी) – बदली रद्द झाल्याचा आनंद व्यक्त करण्यास दोन दिवस उलटत नाहीतोच पुन्हा नगर झेडपीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांची नंदूरबार येथे तर मनपाचे आयुक्त डी.बी. गावडे यांची नाशिक येथे अपर आदिवासी आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे आदेश काल पुन्हा आदेश निघाल्याने विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बिनवडे, गावडे यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर रात्रीतून चमत्कार घडला नि दुसर्‍या दिवशी दोघांच्याही बदल्या स्थगित करण्याचे आदेश निघाले. त्यामुळे या दोघांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला. माने पदभार घेण्यासाठीही आले होते.
13व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे त्यांनी मुक्कामही केला. पण सकाळीच बदली स्थगित झाल्याचे कळताच ते गेस्ट हाऊसमधूनच आपल्या गावी परतले. इकडे आनंदाच्या भरात चाहत्यांनी बिनवडे यांचा सत्कारही केले. काल अचानक या दोघांच्याही बदल्याचे आदेश निघाले नि सर्वांना धक्काच बसला. नेमके काय घडले याचा अनेकजण शोध घेत होते.

LEAVE A REPLY

*