Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अहमदनगर जिल्हा परिषदेचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर

Share

एक लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे

संगमनेर (वार्ताहर) – अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणार्‍या विविध कला गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नव्याने काही स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. विविध स्तरावरील स्पर्धा परीक्षांचे स्वतंत्र वेळापत्रक जिल्हा परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेने यावर्षी हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गोष्ट कथा सादरीकरण, नृत्य व नाटीका, वेशभूषा नुसार सादरीकरण, वैयक्तिक गीत गायन स्पर्धा, समूहगीत गायन स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे.यासंदर्भात अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतंत्र परिपत्रक काढले आहे.

सदरच्या स्पर्धा किलबिल गट इयत्ता पहिली व दुसरी, बालगट इयत्ता तिसरी व चौथी ,किशोर गट इयत्ता पाचवी व सहावी, कुमार गट इयत्ता सातवी आठवी असे गट निश्चित करण्यात आले आहेत. हस्ताक्षर स्पर्धांसाठी इयत्ता पहिली, तिसरी पाचवी व सातवीच्या मराठी विषयाचे पुस्तक उपयोगात आणले जाणार आहे.याकरिता तीस मिनिटांचा वेळ राखीव ठेवण्यात आला असून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी कागद पुरविण्यात येणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी किलबिल गटात माझा गाव ,माझे वडील, माझा वाढदिवस ,माझा आवडता प्राणी .बाल गटासाठी माझा आवडता सण,माझा मित्र मैत्रीण, मी नदी बोलतेय, माझ्या गावची जत्रा. किशोर गटासाठी अशी आहे माझी शाळा ,वृक्ष संवर्धन काळाची गरज ,अशी करीन मी गरजूंना मदत ,माझा आवडता खेळाडू. कुमार गटासाठी स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य घटक. मैदानी खेळ एक गरज. मोबाईल फायदे तोटे, पाणी आडवा पाणी जिरवा आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.गोष्ट कथा सादरीकरण या स्पर्धेत पाच ते सात मिनिटे असून शब्द देऊन गोष्ट कथा सादरीकरण करणे अपेक्षित करण्यात आले आहेत.

ही स्पर्धा किलबिल गटासाठी असणार नाही. वेशभूषानुसार सादरीकरण या स्पर्धेसाठी स्वातंत्र्यसैनिक, महात्मा, क्रांतिकारक ,शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता इत्यादींची वेशभूषा अपेक्षित केली असून पाच ते सात मिनिटाचे सादरीकरण करावे लागणार आहे.

नृत्य व नाटीका यासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्य जोपासणार्‍या कार्यक्रमाचा विषय असणे गरजेचे असून ,या स्पर्धा दोन गटात होणार आहे. पहिली ते चौथी लहान गट व पाचवी ते आठवी मोठा गट निश्चित करण्यात आला आहे. यासाठी 15 मिनिटांचा वेळ आहे . जास्तीत जास्त 20 विद्यार्थ्यांनी सहभाग असणे अपेक्षित आहे. या स्पर्धेसाठी गायन वादनासंबंधी जिल्हा परिषदेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. यासाठी शालेय विद्यार्थी उपलब्ध असल्यास त्यास अतिरिक्त पाच गुण देण्यात येणार आहेत.

वैयक्तिक गीत गायन स्पर्धेमध्ये प्रार्थना, भावगीत ,देशभक्तीपर गीत स्फूर्तीगीत सादर करता येणार असून, गीत गायनासाठी पाच ते सात मिनिटे वेळ राखीव ठेवण्यात आला आहे .गीतास अनुसरून वेशभूषा असणे अपेक्षित आहे. तसेच स्वतः वादन करून गायन केल्यास जास्तीचे दहा गुण दिले जाणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी वाद्य, वादकांची व्यवस्था स्पर्धकांनी करावयाची आहे. समूहगीत गायन स्पर्धेसाठी प्रार्थना, भावगीत, देशभक्तीपर गीत, स्फूर्तीगीत आदी विषयांची निवड करून गीता अनुसरून वेशभूषा असणे अपेक्षित आहे. समूह गीत गाण्यासाठी जास्तीत जास्त दहा विद्यार्थ्यांचा समावेश असणे अपेक्षित आहेत. याकरिता पाच ते सात मिनिटांत राखीव ठेवण्यात आले आहेत.

असे आहे नियोजन शाळा स्तरावरील स्पर्धांसाठी
25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. केंद्रस्तरासाठी 2 डिसेंबर ते 10 डिसेंबर, तालुका स्तर 16 डिसेंबर 23 डिसेंबर, जिल्हास्तर 6 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वेळापत्रक जाहीर झाल्याने जिल्हाभर स्पर्धांचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहेत.

अशी असतील बक्षिसे
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार्‍या वैयक्तिक पातळीवरील स्पर्धांमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक दोनशे रुपये ,द्वितीय क्रमांक एकशे पन्नास रुपये, तृतीय क्रमांक शंभर रुपये .जिल्हा साठी प्रथम क्रमांक पाचशे रुपये , व्दितीय क्रमांक चारशे रुपये ,तृतीय क्रमांक तीनशे रुपये किशोर गट व कुमार गट यांना जिल्हा स्तरासाठी प्रथम क्रमांक सातशे रुपये, द्वितीय क्रमांक पाचशे रुपये व तृतीय क्रमांक चारशे रुपये असे बक्षिसे दिली जाणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर प्रथम 500 रुपये, द्वितीय 400 रुपये,व तृतीय 300 रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून जिल्हा स्तरावर मात्र प्रथम क्रमांक आठ हजार ,द्वितीय क्रमांक सात हजार, तृतीय क्रमांक सहा हजार अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. समूहगीत गायन स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पाचशे रुपये, द्वितीय क्रमांक 400 रुपये,तृतीय 300 रुपये दिले जाणार आहेत .जिल्हा स्तरासाठी प्रथम क्रमांक पाच हजार, द्वितीय क्रमांक तीन हजार ,तृतीय क्रमांक दोन हजार अशी रक्कम निश्चित करण्यात आली आहेत. गुणदानाचे निकष सर्वत्र समान शाळास्तर ते जिल्हास्तर सर्व स्पर्धांसाठी गुणधर्माचे निकष अंतिम करून देण्यात आले आहेत .हस्ताक्षर स्पर्धेसाठी एकूण 40 गुण असून टापटीपपणा ,हस्ताक्षर, शुद्धलेखन ,विरामचिन्हांचा योग्य वापर हे निकष निश्चित करण्यात आले आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी असे आशय, हावभाव ,आवाजातील चढ-उतार ,भाषाशैली ,वेळेचे बंधन ,एकूण परिणाम असे पन्नास गुण राखीव आहेत. गोष्ट कथा सादर करण्यासाठी सुरुवात, सर्व शब्दांचा समावेश, सुसंगत मांडणी ,वेळ, प्रभावी सादरीकरण ,समारोप, वेशभूषे नुसार सादरीकरणासाठी प्रभावी वेशभूषा, विषयाची निवड ,वेळेचे बंधन ,प्रभावी सादरीकरण , संदेश .सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आरंभ, विद्यार्थीसंख्या, विषयाची निवड ,विद्यार्थ्यांचे गायन-वादन, साहित्याचा वापर, हावभाव ,वेशभूषा समारोप आणि एकूण परिणाम हे निकष असणार आहेत. वैयक्तिक गीतगायनासाठी विद्यार्थ्यांचे वादन, सूर,ताल वाद्यांची साथ ,वेशभूषा, एकूण परिणाम, समूह गीत सादर करण्यासाठी विद्यार्थी संख्या, सूर-ताल, वाद्यांची साथ, विद्यार्थ्यांचे वादन ,वेशभूषा, एकंदरित परिणाम असे 50 गुणांचे निकष निर्धारित करण्यात आले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!