विश्‍वजीत माने झेडपीचे नवे सीईओ

0

मनपा आयुक्तपदी मंगळे

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे आणि महापालिकेचे आयुक्त दिलीप गावडे यांच्या महिनाभरापूर्वी झालेल्या बदली आदेशावरील स्थगिती आज उठविण्यात आली आहे.

या आदेशामुळे दोघांनाही आता बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. विश्वजीत माने हे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी तर जी. सी. मंगळे हे महापालिकचे नवे आयुक्त म्हणून पदभार घेणार आहेत.

महिनाभरापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांची नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. महापालिका आयुक्त दिलीप गावडे यांचीही आदिवासी विकास विभाग नाशिक येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली होती.

मात्र सामाजिक व राजकीय हस्तक्षेप वाढल्याने दोघांच्याही बदल्याने शासनाने स्थगिती दिली होती. त्यानंतर महिनाभर हे दोघेही आहे त्याच ठिकाणी कार्यरत होते. शासनाने काल दोघांच्याही बदल्यांना दिलेले स्थगिती आदेश उठविले आहेत. त्यामुळे दोघांनाही आता बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.

मे 2016 मध्ये गावडे यांची अहमदनगर महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली होती. आयुक्तपदाचा पदभार हाती घेताच त्यांनी वाढीव दराच्या निविदा नामंजूर करत अंदाजपत्रकीय दरानुसारच कामे देत ठेकेदारांना दणका दिला होता. त्यानंतरही त्यांनी प्रशासकीय कामातील पारदर्शीपणा कायम ठेवला.

त्यांच्या या कार्यपध्दतीमुळेच पदाधिकार्‍यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. खासदार दिलीप गांधी यांनीही आयुक्त दिलीप गावडे यांच्या बदलीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. महापालिकेतील सत्ताधारी युतीलाही आयुक्त म्हणून गावडे नको होते. महिनाभरापूर्वीच त्यांची बदली झाल्याने सत्ताधारी आंनदीत होते. मात्र दोनच दिवसांत त्यांच्या बदली आदेशाला स्थगिती मिळाली होती.

काल ही स्थगिती उठल्याने अखेर गावडे यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. मंगळे हे महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पदभार घेणार आहेत. बदलीचे तसे आदेश अहमदनगर महापालिकेला बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले आहेत.

दरम्यान आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांचा प्रश्‍न व अनुकंपा शिक्षकांचा प्रश्‍न आपण दोन वर्षांच्या कार्यकाळात पूर्णपणे सोडविता आला, याचे आपणाला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सीईओ रवींद्र बिनवडे यांनी दिली. श्री. माने हे आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहे.

LEAVE A REPLY

*