Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजि. प. सभा ऑनलाईनच!

जि. प. सभा ऑनलाईनच!

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्यावर महाविकास आघाडीचाच दबाव वाढत चालला आहे.

- Advertisement -

दरम्यान, अध्यक्ष क्षिरसागर यांनी सदस्य व पदाधिकाऱ्यांची मागणी झुगारत सभा ऑनलाईनच घेण्यावर ठाम राहत तसा निर्णयही घेतला आहे. शुक्रवारी (दि. ५) महाविकास आघाडीतील शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व सदस्यांनी सभा ऑफलाईन घेण्याची मागणी अध्यक्ष क्षिरसागर यांच्याकडे केली होती.

मात्र, सदस्य व पदाधिकाºयांच्या मागणीला केराची टोपली दाखवत प्रशासनाला शरण जात सभा ऑनलाईन घ्यावी असे आदेश दिले. सभा बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता होईल.

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा ही ऑनलाईन न घेता सभागृहात घ्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली होती. सदस्यांपाठोपाठ उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर यांनीही सदस्यांची मागणी लक्षात घेऊन सभा सभागृहात घेण्याची भूमिका मांडली.

मात्र, प्रशासनाने ऑफलाईन सभेला खोडा घालत करोनाचा बाऊ केला. गेल्या आठवडयात झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रश्नांचा भाडीमार केल्याने प्रशासनाची मोठी नामुष्की झाली होती. ही नामुष्की टाळण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईनचा हट्ट केला जात असल्याची चर्चा होती.

यातच, शिवसेनेचे जि. प. सदस्य दीपक शिरसाठ तसेच राष्ट्रवादीचे सदस्य सिध्दार्थ वनारसे, महेंद्र काले यांसह संभाजी पवार, विनायक माळेकर या शिष्टमंडळाने अध्यक्ष क्षिरसागर यांच्याकडे सभा ऑफलाईन घेण्याची मागणी केली होती.

त्यामुळे अध्यक्ष क्षिरसागर यांच्यावर ऑफलाईन सभेसाठी दबाव वाढला होता. परंतू, सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत प्रशासनाचा हट्ट पुरवित त्यांनी सभा आॅनलाईनच घेण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री उशीरा घेतला. त्यानंतर सदस्यांचा सभेचा ऑनलाईन अजेंडे देखील पाठविण्यात आले.

प्रशासनाचा दबावानंतर निर्णय ?

दरम्यान, सदस्यांसह पदाधिकारी तसेच काही विभागप्रमुखांचाही सभा ऑफलाईन घेण्याकडे कल होता. सदस्यांसह पदाधिकाºयांनी तशी मागणीही अध्यक्षांकडे केली. मात्र, प्रशासन ऑनलाईन सभेसाठी आग्रही राहिले. प्रशासनाच्या दबावापोटीच अध्यक्षांनी ऑनलाईन सभेचा निर्णय घेतल्याची चर्चा सदस्यांमध्ये सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या