Thursday, April 25, 2024
Homeनगर‘ओ मेरे दिल के चैन’, ‘क्या हुआ तेरा वादा’ या गितांनी जिल्हा...

‘ओ मेरे दिल के चैन’, ‘क्या हुआ तेरा वादा’ या गितांनी जिल्हा परिषद कर्मचारी मंत्रमुग्ध

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी यांनी सादर केलेल्या बहारदार गिताने कर्मचारी मंत्रमुग्ध झाले. यावेळी कर्मचार्‍यांनी विविध गीते व नृत्ये सादर केली. वैयक्तिक व सांघिक नृत्य करून सहभागी कलाकारांनी उपस्थितांची चांगलीच दाद मिळविली.

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. दुपारी वाडियापार्क मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, समाज कल्याण सभापती उमेश परहर, सदस्य शरद नवले, महेश सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य रामदास भोर यांच्या उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रमास प्रारंभ झाला.

- Advertisement -

सुरुवातीला अंध असलेले महेश भागवत यांनी श्री गणेशाचे गीत गायण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी ‘क्या हुआ तेरा वादा’… या गाण्याचे सादरीकरण केले. त्यांच्यानंतर समाजकल्याण सभापती उमेश परहर यांनी ‘ओ मेरे दिल के चैन’ हे सदाबहार गित सादर केले. त्यानंतर पुन्हा सोलंकी यांनी ‘परदेसीया, ये सच है, सब कहैते मैने तुझको दिल देदीया’ हे गित सादर केले. सदस्य शरद नवले यांनी त्यांच्या शैली कविता सादर केली. तर अन्य अधिकारी-कर्मचार्‍यांनी गीत गायन व नृत्य केले. या स्पर्धेत विजेता होणार्‍यांना 29 फेब्रुवारी रोजी गौरविण्यात येणार आहे.

यापूर्वीच याच सभागृहात तत्कालीन उपाध्यक्ष सुजीत पाटील झावरे यांनी ‘झाल्या तिन्हं सांजा… वाट पाहते मी येणार साजंन’ ही सदाबहार लावणी सादर केली होती. त्यावेळी देखील कर्मचार्‍यांनी झावरे यांच्यास साज, संगीत आणि सुरातील लय पाहून तोंडात बोट घातले होते. त्याची प्रचिती शुक्रवारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना पुन्हा आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या