शालेय विद्यार्थ्यांचे जि.प. अध्यक्षांकडून स्वागत

0
नाशिक : सध्याचा काळ बघता स्पर्धा खुप वाढलेली आहे. या स्पर्धेच टिकायचे असेल तर शिक्षण हेच शस्त्र आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल उदय सांगळे यांनी सांगितले.

त्या जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालय येथे महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना आणि इतर संस्थांच्या वह्या वाटप कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे, शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी सोनवणे, शिक्षणाधिकारी निरंतर श्री डोंगरे, जि.प.अध्यक्ष यांचे स्वीय सचिव जी.पी. खैरनार, महा.औषध निर्माण अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फैय्याज खान, प्रा. प्रमोद गायकवाड, प्रदीप राठी, विजय देवरे, मुख्याध्यापिका ज्योती चौधरी उपस्थित होते.

पुढे बोलताना सांगळे यांनी आपल्याला ज्यांच्या मुळे शिक्षणाची कवाडे खुली झाली त्यांचे स्मरण करने आपले कर्तव्य आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच मुलींचे विद्यापीठ काढणारे महर्षी कर्वे, आपल्या जीवनात आईचे महत्व जगाला समजावून देणारे साने गुरूजी यांचे शिक्षणासाठी असलेले योगदान सांगितले.

सध्या देशात उच्चपदस्थ असलेल्या मुलींचे संदर्भ देऊन प्रत्येक क्षेत्रात काम करताना मूली कुठेही कमी नसल्याचे सांगितले. नाशिक शहराच्या महापौर एक महिला आहे तर नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सलग चौथ्या वेळी महिला आहे. त्यामुळे महिला सक्षमपाने काम करु शकता, हीच प्रेरणा घेऊन शिका आणि उच्च ध्येय ठेऊन ते मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या. औषध निर्माण अधिकारी संघटनेने “एक वही मोलाची, सावित्रीच्या लेकीची” हा उपक्रम स्तुत्य असून हा कार्यक्रम राबवत असल्याबद्दल औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अभिनंदन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मीना यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना असे सांगितले की, ध्येयप्राप्ति साठी प्रयत्न करा, शाळेला काही अडचणी असल्यास आमच्यापर्यंत आणा, आम्ही त्यावर काही मार्ग काढू. माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, त्यामुळे मला माहित आहे कश्या अडचणी येऊ शकतात. मुलींनी शिकलेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक औषध निर्माण अधिकारी संघटनेचे सल्लागार  जी.पी. खैरनार यांनी केले. प्रास्ताविक मध्ये खैरनार यांनी संघटनेचे कामकाज विषद केले तसेच शिक्षणामध्ये मुलींचा दर्जा ऊंचावा यासाठी “एक वही मोलाची, सावित्रिच्या लेकीची” हे घोषवाक्याच्या आधारे कन्या शाळेतील मुलींना शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन आणि आभार शिक्षिका श्रीमती साठे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*