अपंग कर्मचार्‍यांच्या प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार : डॉ. कोल्हे

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शारीरिक व्यंगावर मात करीत अनेक अपंगांनी विविध क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. योग्य संधी व पाठबळ मिळाल्यास अपंगही सर्वसामान्यांप्रमाणेच चांगले आयुष्य जगू शकतात. शासकीय सेवेत असलेले अपंग कर्मचारी विविध ठिकाणी उत्कृष्ट काम करत असतात.  नगर जिल्हा परिषद प्रशासनाने अपंग कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांची प्राधान्याने सोडवणूक केली आहे. अपंगांचे रोस्टर लवकरच पूर्ण करून पदोन्नतीचा प्रश्‍नही मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिली.
जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग सप्ताह व कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध संवर्गातील गुणवंत अपंग कर्मचार्‍यांचा गुणगौरव सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष दिगंबर घाडगे होते.
याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे, लेखाधिकारी मंगला वराडे, शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले, गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे संचालक शरद सुद्रिक, बाबा पवार, अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप, अपंग कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन संतोष सरोदे, रमेश शिंदे, राधेशाम सपकाळे आदी मान्यवरांच्या उपस्थित 14 तालुक्यातील प्रत्येकी एक कर्मचार्‍यास गुणवंत अपंग कर्मचारी पुरस्कार तर 5 कर्मचार्‍यांना अपंग रत्न पुरस्कार व 2 कर्मचार्‍यांना अपंग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना रोहोकले म्हणाले की, जिल्हा परिषद प्रशासनाच्या सहकार्याने अपंग शिक्षक व कर्मचार्‍यांचे वाहनभत्त्यासह अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. डॉ. कोल्हे यांनी तर नेहमीच सर्व प्रश्‍नांवर सकारात्मक भूमिका घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अपंग कर्मचार्‍यांचे उर्वरित प्रश्‍नही अशा सकारात्मक प्रतिसादामुळे लवकरच मार्गी लागतील, असा विश्‍वास आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम भगत व पोपट धामणे यांनी केले. आभार गजानन मुंडलीक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप, राजू आव्हाड, राजेंद्र औटी, पोपट धामणे, संतोष सरवदे, रमेश शिंदे, दत्ताञय जपे, अनिता जंबे, बंसी गुंड, अजय लगड, संजय बोरसे, सहादू भोंडवे, जयश्री वाघ, बाबासाहेब बोरसे, भाऊराव नागरे, एकनाथ वाडगे, गजानन मुंडलीक, अमोल चन्ने, संजय बोरसे, एकनाथ वाडगे, महेश भागवत यांनी प्रयत्न केले.

हे आहेत पुरस्कारार्थी – 
मंदा भारमल (अकोले), प्रेमनाथ डोंगरे (संगमनेर), राजू आव्हाड, अनिल घोलप (राहाता), योगेश सूर्यवंशी (नगर), बन्सी घुले (पारनेर), चंद्रकांत रायकर (श्रीगोंदा), बळीराम जाधव (कर्जत), यशवंत माळी (राहुरी), खंडू बाचकर (महसूल), दत्तात्रय हजारे (शिर्डी), योगेश भागवत (कोपरगाव), दत्तू फुंदे (शेवगाव), रामकिसन डमाळे (पाथर्डी), प्रशांत दर्शने (श्रीरामपूर), विजय अंधारे (नेवासा), नारायण लहाने (जामखेड), सोमनाथ रोहोकले (मुख्यालय), अभिजित माने (जलतरणपटू विद्यार्थी), दिगंबर घाडगे पाटील (अपंग भूषण), उद्धव थोरात, संतोष सरवदे, एकनाथ वाडगे, दत्तात्रय जपे यांना अपंग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

*