अपघात सुरक्षेच्या दृष्टीने रेनॉ डस्टर नापास; शून्य गुण

0

भारतात तयार झालेल्या रेनॉ डस्टरला आंतरराष्ट्रीय एनएसीपी क्रॅश चाचणीत शून्य मार्क मिळाले आहेत. त्यामुळे अपघात सुरक्षेच्या दृष्टीने ही कार नापास झाली आहे.

डस्टरच्या ‘स्टँडर्ड मॉडेल’ ची अशी ‘धडक चाचणी (क्रॅश टेस्ट) करण्यात आली होती. त्यात चालक आणि त्याच्या शेजारील आसनावरील व्यक्तींचा अपघातात बचाव होऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे.

इतकेच नव्हे, तर मागच्या आसनावर बसलेल्या मुलांच्या दृष्टीनेही ही गाडी तितकीशी सुरक्षित नसल्याचे एनएमसीपीतून उघडकीस आले आहे. मागील आसनावरील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ग्लोबल एनएसीपीने या कारला केवळ २ स्टार दिले आहेत.

ग्लोबल एनएसीपी (नवीन कार तपासणी तंत्र) तर्फे यापूर्वी फोर्ड फिगो आणि शेवरोले गाड्यांची चाचणी करण्यात आली होती.

भारताने ऑक्टोबरपासून नवीन चाचणी पद्धत स्वीकारली असून त्यानुसार अशा ‘क्रॅश टेस्टस्‌’ आता अमेरिकेच्या धर्तीवर ताशी ५६. किलोमीटर वेगावर घेतल्या जातात.

LEAVE A REPLY

*