Type to search

हिट-चाट

‘युवा सिंगर, एक नंबर’ मध्ये जज म्हणून ‘वैभव मांगले’

Share

मुंबई : युवा सिंगर, एक नंबर’ या नव्याकोऱ्या कार्यक्रमाचा प्रोमो पाहिल्यानंतर ‘जज कोण आहे माहिती आहे का?’ हा प्रश्न सगळ्यांनाच सतावू लागला होता. या गहन प्रश्नाचे उत्तर अखेर प्रेक्षकांना मिळाले आहे. कार्यक्रम जसा हटके आणि निराळा असणार आहे, तसेच या कार्यक्रमातील दोघांपैकी एक परीक्षक थोडे वेगळे आहेत.

चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून पडद्यावर दिसणारे व रंगभूमीवर सुद्धा आपल्या अभिनयाची झलक दाखवणारे वैभव मांगले, या कार्यक्रमातील स्पर्धकांचे परीक्षण करणार आहेत. ‘झी युवा’ वाहिनीवरील युवकांच्या या स्पर्धेसाठी एक नवा, ‘युवा’ परीक्षक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परीक्षक म्हणून ‘यंग’ असणारे वैभव मांगले, स्पर्धकांसोबत धमाल करतांना दिसतील.

वैभव मांगले यांना गायनाची आवड आहे आणि खूप कमी लोकांना माहिती आहे कि वैभव यांनी गाण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. लोकप्रिय विनोदी व्यक्तिरेखा साकारणारा वैभव हा एक उत्तम गायक देखील आहे. युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैभवचा हा पैलू सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तरुण स्पर्धकांना मार्गदर्शन करत, वैभव भावनिकदृष्ट्या देखील त्यांना सूचना करेल.

एका वेगळ्या भूमिकेत शिरून, फार कुणाला माहित नसलेली वैभवाची प्रतिभा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर येईल. अभिनय क्षेत्रात आपली खास छाप पाडणाऱ्या या नटाला मुळात गायक व्हायचे होते, हे फार थोड्या मंडळींना ठाऊक आहे. परीक्षण करण्याची संधी व स्वप्नपूर्ती झालेली असल्याने, या नव्या भूमिकेत शिरणे वैभवला फार आनंदाचे असणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!