‘महाशिवरात्री’निमित्त ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’

0
मराठी संस्कृती आणि मूल्य झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी नेहमीच जपली आहेत. यंदाही महाशिवरात्री निमित्त झी टॉकीजकडून ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ म्हणजे भक्तजन आणि प्रेक्षक यांच्यासाठी भक्तिमय कीर्तनाची पर्वणीच सादर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठी संस्कृतीतील एक धार्मिक सण म्हणजे ‘महाशिवरात्री’ आणि सणाचं औचित्य साधून झी टॉकीजनी या खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. १२ – १८ फेब्रुवारी या सप्ताहात प्रेम या विषयावर ह. भ. प. माधवजी महाराज रसाळ यांनी भक्तजनांसाठी प्रेम या विषयावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पिंपळे-सौदागर, पुणे येथे कीर्तनाचे आयोजन केले आहे.

‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ हा खास कार्यक्रम महाशिवरात्रीच्या मंगलमय दिवशी सकाळी ७:३० वा. प्रसारित होणार आहे.

LEAVE A REPLY

*