Type to search

हिट-चाट

तुझ्यात जीव रंगला मध्ये राजा राजगोंडाची एंट्री

Share

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकतंच या मालिकेत एक धक्कादायक वळण आलं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्यासेटवरील राणादाला मारहाण होत असतानाचे काही फोटो लीक झाले होते, त्यानंतर राणादा मारणार हि जोरदार चर्चा सुरू झाली आणि खरंच राणादा या व्यक्तिरेखेचा मालिकेत शेवट झाला.

राणा गेल्यानंतर मालिकेने २ वर्षांची लीप घेतली. राणा गेल्यानंतर गावात आता नंदिताची सत्ता आहे. नंदिताने पप्याच्या गुंडांच्या मदतीने गावात दहशत माजवलीये. सूरज दारुच्या नशेत बुडाला आहे. आबाअज्ञातवासात आहेत. गावातले लोक नंदिताच्या छळामुळे त्रस्त आहेत. पण या सगळ्यांना नंदिताच्या त्रासापासून वाचवायला राणा पुन्हा येणार आहे.

नुकतंच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी राणाचा नवीनअवतार पाहिला. हा राणा डॅशिंग आणि बिनधास्त आहे. हा राणा, राणा नसून त्याचं नाव राजा राजगोंडा आहे. त्याचा लुक देखील राणा पेक्षा खूप वेगळा आहे. राजा एखाद्या साऊथ इंडियन हिरो सारखा दिसतोय.

हा राजा आता मालिकेत साऊथचा तडका घेऊन येणार इतकं मात्र नक्की. राणाचा राजा कसा झाला? राजा नंदिता आणि पप्याला कसा धडा शिकवणार? अंजलीला भेटल्यावर राजाची प्रतिक्रिया काय असेल याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील. या नव्या राजाची एंट्री प्रेक्षक २८ जून रोजी मालिकेत पाहू शकणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!