थायलंडमध्येही ‘जय मल्हार’चा जयघोष

0
मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या खंडेरायावर आधारित मजय मल्हारफ या मालिकेनं मराठीत लोकप्रियतेचं शिखर गाठल्यानंतर हिंदी भाषेतही या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता थेट भारताबाहेर मसदानंदाचा यळकोट… यळकोट, यळकोट जयमल्हारफ असा आवाज दुमदुमनार आहे. आता ही मालिका थायलंडमध्येही प्रसारित होणार असून मखंडेरायाफ साकारलेल्या देवदत्त नागे यानं इन्स्टाग्रावर ही माहिती दिली आहे.

थायलंडमधील ‘झी नून्ग’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे,’ असं देवदत्तनं त्याच्या इन्स्टाग्रावर पोस्टमध्ये लिहिलं आहे. खंडेराया आणि त्याच्या दोन राण्या यांची कथा रंगल्यामुळं या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि अनपेक्षितरित्या ही मालिका तीन वर्षे रंगली. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा केसकर या तीनही कलाकारांना या मालिकेनं राज्याच्या कानाकोपर्‍यातून उदंड प्रेम मिळवून दिलं. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून व्हीएफएक्स पद्धतीनं या कथानकाला अधिक भव्यता मिळवून देणारी ही मराठीतील पहिली मालिका ठरली होती.

LEAVE A REPLY

*