Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव शैक्षणिक

बालकांच्या पायाला टोचलेला काटा प्रत्येक संवेदनाक्षम मनाला बोचला पाहिजे – गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे

Share

शेळावे, ता.पारोळा । वार्ताहर

जि.प.प्राथमिक शाळा धाबे (ता.पारोळा) या ठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व 57  विद्यार्थ्यांना मान्यवर दात्यांच्या दातृत्वातून शाळेचे बुट, पायमोजे, शाळेचे दप्तर व चॉकलेट मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद पसरला होता. आजच्या या स्तुत्य उपक्रमाला पारोळा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे व दाते शामकांत पोपटराव साळुंखे भिलालीकर, माध्यमिक शिक्षक लोणी हायस्कुल हे उपस्थित होते.

अगोदर श्रीमती कविता सुर्वे यांची गट शिक्षणाधिकारीपदी निवड झाली म्हणून धाबे शाळेकडून त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व भेटवस्तु देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी परिसरातील जवळच्या उत्रड शाळेचे मुख्याध्यापक भुषण पाटील, तांबोळे शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र नांद्रेकर, हिरापुर शाळेचे मुख्याध्यापक विजय मेणे यांनीही त्यांचा यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाला बहादरपूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब चंद्रकांत चौघरी यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. त्यांच्याही सर्व शाळांनी सत्कार केला. दाते शामकांत साळुंखे यांचेही स्वागत व सत्कार धाबे शाळेने केला.

तसेच आपल्या पारोळा तालुक्याचे भुमीपुत्र देवगावचे प्रशांत प्रभाकर जाधव-पाटील, उप पोलिस अधिकारी, एम.आर.ए.मार्ग पोलिस स्थानक मुंबई यांनी त्यांच्या मुंबईच्या मित्रांना धाबे शाळेच्या उपक्रमांची माहिती दिल्यावर गॉड व्हॅलिन्टर मुंबईचे एन.जी.ओ. हरिष गाला साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट पायमोजे, दप्तर व लॉलीपॉप चॉकलेट जाधव साहेबांच्या हस्ते दिवाळी भेट म्हणुन पाठवुन दिले. या वस्तुंचे वाटप श्रीमती कविता सुर्वे व शामकांत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना सॅण्डल व बुट मोजे वाटपाचा हा गेल्या सात वर्षातील तीसरा कार्यक्रम शाळेने घेतला.

यावेळी गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांनी धाबे शाळा लोकसहभागातून व येथील शिक्षकही स्वखर्चाने गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व प्रकाराचे शैक्षणिक साहित्य व इतरही उपयुक्त साहित्य सतत वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवितात. याठिकाणी बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या पायाला अजुन पादत्राणे लागलेली नाही हे ऐकून वाईट वाटते. त्यांच्या पायाला लागलेले चटके त्यांना टोचलेला काटा समाजातील प्रत्येक संवेदनाक्षम व सक्षम मनाला बोचला पाहिजे व त्यांनीही शामकांत साळुंखे व हरिष गाला यांच्या सारखे गरिब व गरजु बालकांच्या मदतीसाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. या दोघांचेही आभार मानून अभिनंदन केले. सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!