Thursday, April 25, 2024
Homeजळगावआजपासून युवारंग महोत्सवाचा थरार

आजपासून युवारंग महोत्सवाचा थरार

शहादा – येथील पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात उद्या दि. 16 जानेवारीपासून विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या युवारंग महोत्सवात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 125 महाविद्यालयातील सुमारे 2500 युवक-युवतींसह व्यवस्थापक व मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. युवारंगचा उद्घाटन सोहळा 17 जानेवारी रोजी अणुुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे, तर पारितोषिक वितरण दि.20 जानेवारी रोजी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दि. 17 जानेवारी रोजी युवारंगचे उद्घाटन डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.डॉ.पी.पी.पाटील उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, श्रीमती कमलताई पाटील, प्रभारी कुलगुरु पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव युवारंग 2019-20 चा आनंद घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी.आर.पाटील, युवारंगचे कार्याध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील, विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ.बी.व्ही.पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, युवारंगचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल यांनी केले आहे.

पाच रंगमंचावर तीन दिवस भरगच्च कार्यक्रम

युवक महोत्सवासाठी मंडळाच्या प्रांगणात पाच रंगमंच तयार करण्यात आले आहेत. यातील रंगमंच क्रमांक एकवर उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा होईल. दि.17 रोजी रंगमंच एकवर मिमिक्री, विडंबन नाट्य, रंगमंच दोनवर भारतीय लोकगीत, रंगमंच तीनवर काव्यवाचन, रंगमंच चारवर शास्त्रीय वादन (सूरतालवाद्य), रंगमंच पाचवर रांगोळी व व्यंगचित्र स्पर्धा होतील. 18 रोजी रंगमंच एकवर विडंबन, मूकनाट्य, रंगमंच दोनवर सुगम गायन पाश्चिमात्य, समूहगीत, रंगमंच

तीनवर वादविवाद, रंगमंच चारवर सुगम गायन भारतीय, शास्त्रीय गायन, रंगमंच पाचवर कोलाज, क्ले मोडेलिंग, स्पॉट पेंटिंग स्पर्धा होतील. दि.19 रोजी रंगमंच एकवर समूहनृत्य, रंगमंच दोनवर  शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, रंगमंच तीनवर वक्तृत्व, रंगमंच चारवर फोटोग्राफी, रंगमंच पाचवर चित्रकला, इन्स्टॉलेशन, मेहंदी स्पर्धा होतील. सर्व स्पर्धा त्या-त्या रंगमंचावर दररोज सकाळी 9 वाजता सुरू होतील. सहभागी स्पर्धकांच्या भोजनाची वेळ सकाळी 11 ते 1 व रात्री 6 ते 8 दरम्यान राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या