युवा फ्रेंड्स श्री 2017 चा किताब नगरला

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- उत्तर विभागीय नगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटना व श्रीरामपूर तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने युवा फ्रेंडस ग्रुप आयोजित उत्तर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत युवा फ्रेंडस श्री 2017 चा किताब नगरच्या महेश गोसावी याने आपल्या नावावर केला. तसेच बेस्ट पोझर जितेंद्र गिरी (जळगाव) व बेस्ट इम्प्रुव्हमेंटचा किताब सर्जेराव खरात (नगर) याला मिळाला.
येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती सचिन गुजर व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी नगरसेवक मुश्ताक शाह, चंद्रकांत परदेशी, नंदकुमार डहाळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सिद्धार्थ फंड, युवराज फंड, अरुण मंडलिक, डॉ. राहिंज, डॉ. शिंदे, तुषार चोथाणी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी नगर, नाशिक, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यातून 100 हून अधिक बॉडी बिल्डर सहभागी झाले होते. 55 ते 80 वजनी गटात झालेल्या स्पर्धेतून प्रत्येकी तीन विजेते निवडण्यात आले. त्यातील प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकातून अंतिम विजेता उत्तर महाराष्ट्र युवा फ्रेंडस, तसेच बेस्ट पोझर व बेस्ट इम्प्रुव्हमेंटची निवड करण्यात आली.
पंच म्हणून जिल्हा बॉडीबिल्डींग असोसिएशनचे संस्थापक सचिव मधुकर गायकवाड, अध्यक्ष जितेंद्र भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष मयूर दरंदले, कैलास रणसिंग, श्रीरामपूर तालुका बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे संस्थापक सचिव सतिश रासकर यांनी काम पाहिले. यावेळी गणेश महाले, सागर दुपाटी, पवन औताडे, महेश निंबाळकर, आनंद वाघ, नंदकुमार डहाळे, अरविंद यादव, विशाल दुधाळ, लखन वायकर उपस्थित होते. प्रास्ताविक सागर दुपाटी यांनी तर सूत्रसंचालन बंडू शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

*