युसूफचा ‘एक’दिवसीय सामन्यात 1230 धावांचा अनोखा विक्रम…

0

2016 सालच्या पहिल्याच दिवशी कोरी अँडरसनने वेस्ट इंडीज विरुद्ध 36 चेंडूत सर्वाधिक वेगवान एकदिवसीय शतक झळकवून क्रिकेट जगतात अनोखा विक्रम आपल्या नवी केला होता.

पण त्यानंतर अँडरसनचा रेकॉर्ड अवघ्या 18 दिवसांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू एबी डिव्हिलियर्सने वेस्ट इंडीजच्या विरुद्ध 31 चेंडूंमध्ये केला आणि जगातील सर्वात वेगवान शतक झळकावले.

अशाच काही चित्र-विचित्र विक्रम युसूफ पठाणच्या नवे झाला आहे. या विक्रमाची कल्पना अद्याप त्याला हि नसेल, आजवर युसूफ पठाणने 57 एकदिवसीय सामने खेळले असून आतापर्यंत 810 धावा केल्या आहेत.

अष्टपैलू क्रिकेटपटूच्या नावे 1230 धावांचा विक्रम आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एकदिवसीय  कारकिर्दीत 810 धावा केलेल्या युसूफच्या नावे 1230 धावांचा विक्रम कसा? यासाठी आम्ही जाण्यापूर्वी, स्पष्ट करू इच्छितो की हे फक्त विकिपीडियाच्या वेबसाईटवर आहे.

असा कोणतही विक्रम युसूफने केला नाही. तर युसूफ पठाणच्या विकिपीडियाच्या प्रोफाइल पेजवर ‘टॉप स्कोअर’ च्या आकडेवारीनुसार 1230 असे आहे.

शून्याची भर घातल्याने विकिपीडियाने चित्र विचित्र विक्रम युसूफ नावे केला. तर सर्वोच्च एकदिवसीय स्कोअर 123* आहे.

जेव्हा विकिपीडियाला आपल्या चुकेची जाणीव झाली, तेव्हा तत्काळ त्यांनी चूक दुरुस्त केली.

युसूफने, शेवटचा एकदिवसीय सामना 18 मॅच 2012  रोजी खेळला होता.

 

 

LEAVE A REPLY

*