YouTube Rewind 2017 : यूट्युबच्या यादीत ढिंच्याक पूजाचा समावेश!

0

‘love me or hate me but you can’t ignore me’ या गाण्याने या वर्षीच्या सुरुवातीपासून ढिंच्याक पूजा हे नाव चर्चेत आले.

तिच्या यूट्युब व्हिडिओंपेक्षा सोशल मीडियावरच्या ट्रोलिंग्समुळे ढिंच्याक पूजाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

अनेकदा तिला ट्रोल केले गेले, तिची खिल्ली उडवली पण तिची प्रसिद्धी तसूभरही कमी झाली नाही.

आता यूट्युब रिवाईंड 2017 च्या यादीतही स्थान मिळवण्यात ढिंच्याक पूजाला यश आले आहे.

अमेरिकन गायिका विद्या अय्यर, विनोदी कलाकार भुवन बाम, शाकाहारी शेफ निशा मधुलिका हे भारतीय यूट्युबवरचे सर्वात प्रसिद्ध चेहेरे ठरले आहेत आणि या यादीत पूजा जैन म्हणजेच ढिंच्याक पूजानंही स्थान मिळवले आहे.

यूट्युब रिवाईंड 2017 च्या माहितीनुसार ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाचे टाइटल ट्रॅक ‘तम्मा तम्मा अगैन’ आणि ‘गुरु रंधावा’ चा ‘हाई रेटेड गबरू’ हे 2017 मधल्या ट्रेंडिंग गाण्याच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

‘पोर्टल ए इंटरएक्टिव’ आणि यूट्युब मिळून 2017 मधल्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओ, गाणी, चित्रपट अशा वेगवेगळ्या प्रकारातल्या व्हिडिओंची मालिका तयार करत आहे.

या मालिकेतील प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये स्थान मिळवण्यात पूजा यशस्वी ठरली आहे.

त्याचबरोबर तन्मय भट्ट, 106 वर्षांच्या आजी मस्तानम्मा यांचादेखील समावेश आहे.

LEAVE A REPLY

*