Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लष्कर भरतीसाठी हजारो युवक देवळालीत दाखल

Share

देवळाली कॅम्प | वार्ताहर

येथील टीए बटालियनच्या ६३ जागांसाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियासाठी देशभरातील ९ राज्य व ३ केंद्रशासित प्रदेशातील हजारो युवक देवळालीत दाखल झाले आहेत.

ऐन दिवाळीत ही भरती प्रक्रिया असल्याने बाजारपेठेत गर्दी झाली असतांना लष्कर भरती च्या गर्दी मुळे रस्त्यांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भरतीसाठी आलेल्या युवकांची खाणे पिणे व राहण्याची कुठली सोय नसल्याने आलेले युवक मंदिरे, सभागृह व रस्त्यावर थांबले आहेत.

त्यातच पाऊस सुरू असल्याने या यवकांच्या समस्येत वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या युवकांसाठी प्राथमिक गरजा पुरावण्याबाबत तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून सूचना केल्या आहेत.

उद्या (दि ३०) रोजी महाराष्ट्रतील युवकांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहेत आंनद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर ही भरती प्रक्रिया लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!