Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

निंबळक बायपासवर तरुणाचा खून

Share
नेवाशाच्या मशिदीत आढळले 10 परदेशी नागरिक, Latest News Newasa Mosque Foreign People

अहमदनगर (प्रतिनिधी)-  सरत्या वर्षाचा शेवटी निंबळक बायपास रोडवर तलवारीने वार करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (दि. 31) सकाळी ही घटना उघडकीस आली. नवनाथ गोरख वलवे (वय- 32 रा. सारोळाकासार ता. नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खिशातील पाकिटात असलेल्या ओळखपत्रावरून पोलिसांना त्याची ओळख पटली. निंबळक बायपास रोडवरील लामखडे पेट्रोलपंपपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर शेतात वलवेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोेहचला. ही माहिती समजल्यानंतर सारोळा कासारचे लोकही तिथे जमा झाले.

नवनाथ वलवे हा ट्रक चालक होता. तो दूध पावडर वाहतुकीची ट्रक चालवित होता. दूध पावडर पुरवठा करण्याचा व्यवसाय तो करत असून व्यावसायिक वादातूनच त्याचा खून झाला असावा अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.

दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी वलवेच्या मृत्यूदेहचा घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. मृत नवनाथच्या डोक्यावर तसेच पोटावर तलवारीचे वार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोमवारी रात्री किंवा मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!