Friday, May 3, 2024
Homeधुळेशिरूड येथे नदीत बुडून भडगावातील तरूणाचा मृत्यू

शिरूड येथे नदीत बुडून भडगावातील तरूणाचा मृत्यू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यातील शिरूड येथे नदीत बुडून भडगाव येथील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना

- Advertisement -

काल सकाळी घडली. याबाबत तालुका पोलिसात नोंद झाली आहे.नाना संभाजी सोनवणे (वय 28 रा. बात्सर पोस्ट शिवनी, ता. भडगाव जि. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

तो काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शिरूड ते पारोळा रस्त्यवरील मांदुर हॉटेलसमोर मांदुर नदीवरील बंधार्‍याजवळ नदीमध्ये पोहण्यासाठी व आंघोळीसाठी गेला होता.

तेव्हा तो पोहता पोहता नदीच्या मध्यभागी गेला. मात्र त्यांच्या पाय गाळमध्ये अडल्याने तो मला वाचवा-वाचवा, अशी आरडा-ओरड करू लागला.

तेव्हा बाहेर थांबलेला त्याचा चुलत भाऊ विक्की हा त्याला वाचविण्यासाठी पाण्यात गेला. पाणी खोल व गाळ देखील होता.

त्यात विक्की हा नानाला वाचवत असतांना तो पकडत असल्याने विक्की घाबरून बाहेर आला. त्यानंतर त्याने ग्रामस्थांच्या मदतीने नदीत शोध घेवून नाना याला बाहेर काढण्यात आले.

त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत धुळे तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या