Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सातव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांची जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी 

अंबड येथील एका सोसायटीत पीओपीचे काम करण्यासाठी गेले असता सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हियात्तुला ईनायत्तूला खान असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सदर व्यक्ती कुटुंबाचा प्रमुख होता. त्यांच्यासोबत दोन मुलं बायको राहत होते. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी हियात्तुला खान यांच्यावर होती. यांच्या हियात्तुला यांना शव विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.

यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की हियात्तुला हे पीओपी चे काम घरात करण्यासाठी गेला होता.

पीओपीचे काम हे घरातच होत असते छतावर होत नसते तर मग हियात्तुला हे सातव्या मजल्यावर गेले कसे आणि पडले कसे असा सवाल नातेवाईक करत आहे. संपूर्ण प्रकार संशयास्पद असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी अशी नातेवाईकांनी मागणी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!