सैन्यभरतीत अपयश आल्याने चांदवड तालुक्यातील तरूणाची आत्महत्या

0
चांदवड| सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्नशिल असलेल्या वाहेगावसाळ येथील आदिवासी वस्तीतील २२ वर्षिय तरूणाने नोकरीच्या हुलकावणीमूळे वैफल्यग्रस्त होऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार (दि.१०) रोजी उघडकीस आली.

वाहेगावसाळ ता. चांदवड येथील आदिवासी वस्तीतील मोलमजूरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या कुटूंबातील मच्छिंद्र बबन मोरे (वय २२)  याने आर्थिक अडचणींचा सामना करीत बारावीपर्यंत शिक्षण करून सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्नात सर्व चाचण्या पार करून वैद्यकिय चाचणीत नोकरीत हुलकावणी बसत आहे.

अनेक मित्र सैन्यदलात भरती झाले असतांना मोरे यास येणार्‍या अपयशाने नैराश्य आले होते. यातूनच त्याने (दि.९) च्या रात्री राहत्या घराच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलीस पाटील दीपक खैरे यांच्या खबरीवरून चांदवड पोलिसांनी स्थळ पंचनामा करत चांदवड उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

मच्छिंद्र याच्यावर वाहेगावसाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात आई, वडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*