देशसेवेसाठी युवकांचा वाढता पुढाकार – उद्योगपती महाराज बिरमानी

0
देवळाली कॅम्प ​(प्रतिनिधी) ​| आजचा युवक देशसेवेसाठी वाढता पुढाकार घेत लष्करी आस्थापनासह सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत असून भोसला मिलिटरी स्कुलच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी हातभार लागत आहे.आरोग्य जपण्यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्रेकिंगचे धडे मिळत असल्याचे प्रतिपादन आंतराष्ट्रीय ख्यातीचे उद्योगपती महाराज बिरमानी यांनी केले.

भोसला मिलिटरी स्कुलचे शंभराहून अधिक प्रशिक्षणार्थी देवळालीतील लष्कराचे सुभेदार दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुबाई व भंडारदरा येथे ट्रेकिंगसाठी जात असतांना येथे सकाळी त्यांचे स्वागत व नाश्ता पाणी याची व्यवस्था शिवयुवा प्रतिष्ठानकडून करण्यात आली होती.

त्यानिमित्ताने महाराज बिरमानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी त्यांच्यातील देवानिश शहा,सौरभ कुलकर्णी,आदित्य निकम,सौरभ मोकाशी या चार विद्यार्थ्यांची एनडीएमध्ये निवड झाल्याने त्यांचा प्रतिष्ठानकडून सत्कारही करण्यात आला.

उत्तम आरोग्य वाढीसाठी हिवाळा ऋतू पोषक असल्याने या दरम्यान सायकलिंगसह ट्रेकिंग उपक्रम राबविल्यास मानवी शरीर अधिक मजबूत बनत असल्याचे सुभेदार दीपक चवहीन यांनी सांगितले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड, सूर्यकांत मोजाड, अमोल जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, गोकुळ मोजाड, सुभाष कडभाने, उमेश चौधरी, स्वनिल गवळी, संदीप डांगे, संजय ताजनपुरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*