‘कृषीथॉन’मध्ये कर्तृत्त्ववान युवा शेतकर्‍यांचा होणार सन्मान

0
नाशिक । ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि.यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीक्षेत्रात कष्ट आणि कल्पकतेतून अभिनव प्रयोग करून शेती, संशोधन आणि उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय काय करणार्‍या युवक आणि महिलांचा गौरव व्हावा, यासाठी दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय ‘कृषीथॉन युवा सन्मान’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

प्रयोगशील युवा शेतकरी (पुरुष आणि महिला), प्रयोगशील युवा कृषी संशोधक, प्रयोगशील युवा कृषी उद्योजक या तीन गटात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

महाराष्ट्रात शेती क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत अनेक युवक, महिला शेती व्यवसायात कष्ट आणि कल्पकतेतून शेती क्षेत्र रोजगाराचा एक नवा पर्याय वर आणत आहेत. अशा युवक, महिलांचा गौरव व्हावा, त्यांच्या कृषी योगदानाची दखल घेतली जावी या उद्देशाने ‘कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कार2017’ चे आयोजन करण्यात आले आहे.

पुरस्कारासाठी कृषीसंबंधी संशोधन, उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या अनेक युवकांचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून प्रस्ताव प्राप्त झाले होते. पुरस्कार निवड समितीमध्ये राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे माजी सहसंचालक डॉ.सतीश भोंडे व ज्येष्ठ कृषी शास्रज्ञ डॉ. जयराम पूरकर यांनी विविध निकषांवर पुरस्कारांची निवड केली.

कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कार : प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (पुरुष गट) योगेश पवार (नाशिक विभाग), अप्पा कारमकर (पुणे विभाग), विष्णू मुसळे (औरंगाबाद विभाग), राहुल रौंदळ (अमरावती विभाग), राहुल सुपारे (नागपूर विभाग)

प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (महिला गट ) ज्योत्स्ना सुरवाडे (नाशिक विभाग), विभावरी जाधव (पुणे विभाग), रेखा वहाटूळे (औरंगाबाद विभाग), श्रद्धा पोतदार(कोकण विभाग), कल्पना दामोदर(अमरावती विभाग), रुपाली पाटील (नागपूर विभाग)

प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार

डॉ. अंकुश चोरमुले (नाशिक विभाग), डॉ. मिलिंद जोशी (पुणे विभाग ) डॉ. अर्चना कवडे (औरंगाबाद विभाग), दीपक क्षीरसागर (कोकण विभाग ), डॉ. दीप्ती वानखेडे (अमरावती विभाग), डॉ.स्मित लेंडे (नागपूर विभाग )

प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार
सरोजिनी फडतरे (नाशिक विभाग), रोहन उरसळ (पुणे विभाग), अभिजित वाडेकर (औरंगाबाद विभाग), समृद्धी परांजपे(कोकण विभाग), उद्धव नेरकर (अमरावती विभाग ), ब्रम्हानंद पांगुळ (नागपूर विभाग)

विशेष गौरव पुरस्कार
डॉ. अमित शर्मा (युवा कृषी संशोधक, करणाल, हरयाणा), आकाश चौरसिया (युवा शेतकरी सागर, मध्य प्रदेश), रोकडेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी, निमगाव ता. सिन्नर(आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी) भागवत बलक(उत्कृष्ट सेंद्रीय शेतकरी-वडगाव ता.सिन्नर ).

LEAVE A REPLY

*