तुम्ही सांगाल तो उद्योग मी नाशिकमध्ये आणेल – मेक इन नाशिक कार्यक्रमात केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते यांचा नाशिकरांना शब्द

0

मुंबई (पंकज जोशी) | मेक इन नाशिक हा स्तुत्य उपक्रम आहे. मेक इन नाशिक आणि निमाला सांगू इच्छितो की, तुम्ही सांगाल तो उद्योग मी मी नाशिकमध्ये आणेल.

मेक इन गुजरात होतो तर मेक इन नाशिक का नको? असे सांगत केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते यांनी नाशिकच्या उद्योग विकासासाठी शब्द दिला आहे.

मेक इन नाशिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते मुंबईत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र एक क्रमांकाचे राज्य करण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्रालय नियमित सहकार्य करत राहील.

नाशिक देवभूमी आहे  नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी अपेक्षित सर्व सहकार्य करू असे सांगत केवळ सेमिनारला बोलावू नका तर विकासाचे मुद्दे घेऊन आमच्या मंत्रालयात या असे गीते यांनी सांगितले.

नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांचे निमंत्रण स्वीकारले असल्याचेही गीते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

*